Pune By Poll Election esakal
Election News

कसबा-चिंचवड पोटनिवडणुकांसाठीचे मतदान समाप्त; जाणून घ्या, कुठे किती टक्के मतदान झाले

पुणेकरांचा मतदानाला अल्प प्रतिसाद

रुपेश नामदास

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूकीच्या प्रचाराच्या तोफा शुक्रवारी सायंकाळी थंडावल्या. भाजप आणि महाविकास आघाडीने केलेल्या प्रतिष्ठेच्या या पोटनिवडणूकीत दोन्ही पक्षांकडून दिग्गज नेत्यांच्या फौजा प्रचारासाठी पुण्यात तळ ठोकून होत्या.

दोन्हीही बाजूने स्टार प्रचारकांची कोणतीच कमी नव्हती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील या निवडणूकीत उतरले होते.

दरम्यान या दोन्ही जागांसाठी आज मतदान पार पडलं आहे. कसब्यात दिवसभरात मोठ्या घडामोडी घडल्या भाजपच्या गणेश बीडकरांवर पैसै वाटपकरण्यात आल्याचा आणि काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला.

दरम्यान 5 वाजे पर्यंत कसबा पोटनिवडणूकीत एकूण 45.25 टक्के मतदान पार पडलं आहे. तर प्राचार्य विनोबा भावे स्कुल, गंज पेठ मतदान केंद्रावर शेवटच्या अर्धा तासात तुफान गर्दी झाली होती.

चिंचवड पोटनिवडणूक

चिंचवडमध्ये देखील सकाळ पासूनच मतदानासाठी नागरिक बाहेर पडले होते. येथे भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये थेट लढत होत असल्यामुळे ही निवडणुक अटीतटीची होणार आहे. चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 5 वाजे पर्यंत एकूण 41.1 टक्के मतदान पार पडलं. त्यामुळे आता सर्व उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झालं आहे, तर आता २ मार्चला कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पोटनिवडणुकीला गालबोट

पिंपळे गुरव मतदान केंद्रावर अंघोळकर आणि राहुल कलाटे यांचे समर्थक एकमेकांना भिडले. दोन्ही समर्थकांमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाची झाली. त्यामुळे मतदान केंद्रावर तणावग्रस्त वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर समर्थकांमधील वाद मिटला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT