राजेश पांडे Sakal
Election News

Pune Corporation Election: निवडणुकीची सूत्रे राजेश पांडे यांच्याकडे

पुणे महापालिका निवडणूक प्रमुख पदावर राजेश पांडे यांच्या नियुक्तीची घोषणा

मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीमध्ये पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाची (BJP) सत्ता राखण्यासाठी शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे (Rajesh Pandey) यांची पक्षाने महापालिका निवडणूक प्रमुख या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे. नेत्यांच्या भाऊगर्दीत समन्वय राखून सत्ता प्राप्तीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भाजपने ही चाल खेळली आहे. (Pune Corporation Election Updates)

मितभाषी असलेले पांडे हे गेल्या 40 वर्षांपासून संघ परिवारात सक्रिय आहेत. मूळचे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील रहिवासी असलेले पांडे अकरावीमध्ये शिक्षणासाठी पुण्यात आले. तेव्हापासूनच ते पुण्यात आले. करियरच्या सुरवातीच्या टप्प्यात ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये होते. या परिषदेमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरावरही काम केले आहे. शैक्षणिक प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी अभाविपने 1993 मध्ये मुंबईत सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांचा राज्यव्यापी मोर्चा काढला होता.

त्याचे संयोजन पांडे यांनी केले होते. तेव्हा राज्यात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांचा इतका मोठा मोर्चा निघाला होता. त्याचबरोबर भारतीय जनता युवा मोर्चाचे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे प्रभारी असताना पांडे सहप्रभारी होते. यापूर्वी त्यांनी महानगर सरचिटणीस म्हणूनही काम पाहिले आहे.

एमकॉम, एमफिलपर्यंत शिक्षण झालेले पांडे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीचे ही सदस्य आहेत. मुंबई महापालिकेमध्ये सत्ता मिळवण्यासाठी पक्षाने अशिष शेलार यांची नियुक्ती केली आहे, त्याच धर्तीवर पुण्यासाठी पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे दोन खासदार असून सहा आमदार आहेत.

त्याचप्रमाणे महापालिकेत शंभर नगरसेवक आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचाही पुण्यात वावर असतो. त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचीही शहरात मोठी संख्या आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवाराचीही ही पुण्यामध्ये ताकद आहे.

त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधी, संघ परिवारातील कार्यकर्ते आणि पक्षाचे तळागाळातील कार्यकर्ते यांच्यात समन्वय साधून सत्ता प्राप्तीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पांडे यांची निवड झाल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आव्हान परतावून लावण्यासाठी पांडे यांच्यावर भाजपची पुण्यातील सत्ता राखण्याची मोठी जबाबदारी पडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT