pune corporation sakal media
Election News

Corporation Election: गोखलेनगर-पंचवटी मधून तब्बल दोनशे सोळा हरकती

हनुमान टेकडी ओलांडून अल्पसंख्यक गुंजाळवाडी या भागाचा काही भाग डोंगर ओलांडून दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

शिवाजीनगर : नुकत्याच जाहीर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेल्या नकाशात प्रभाग क्रमांक पंधरा गोखलेनगर - पंचवटी या प्रभागाचे अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण पडू नये म्हणून भौगोलिक दृष्ट्या सोयीस्कर असताना देखील गुंजाळवाडी या वस्तीचे विभाजन करून हा भाग प्रभाग क्रमांक सोळाला जोडण्यात आला. असे आरोप सर्वपक्षीय स्थानिक कार्यकर्त्यांनी करून शेकडो हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. (Pune Corporation Election Updates)

हनुमान टेकडी ओलांडून अल्पसंख्यक गुंजाळवाडी या भागाचा काही भाग डोंगर ओलांडून दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आला, तर चतुर्श्रुंगी डोंगराच्या पलीकडील भागातील चार याद्या प्रभाग पंधरा मध्ये जोडण्यात आल्या आहेत. हे सर्व राजकीय दबाव व हस्तक्षेपामुळे झाल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.

आज पुणे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त रवी खंदारे यांच्या घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग पंधराच्या संदर्भात दोनशे सोळा हरकतीची नोंद झाल्याचे खंदारे यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते बाळा चव्हाण, सचिन इंगळे, राजश्री अडसूळ, राजेश नायडू, रमेश भंडारी,संजय तुरेकर, अजित इंगळे,रुपेश सोनवणे, भूषण भवर,राजेश काकडे, विशाल गायकवाड आदींसह अनेक नागरिकांनी हरकती नोंदण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयात गर्दी केली होती.

शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग नुसार आलेल्या हरकती

  • प्रभाग दहा शिवाजीनगर गावठाण - संगमवाडी एक

  • प्रभाग पंधरा गोखलेनगर-पंचवटी दोनशे सोळा

  • प्रभाग सोळा फर्ग्युसन कॉलेज- एरंडवणे पाच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Incident: 180 प्रवाशांचा जीव... '9/11' सारख्या हल्ल्याचा धोका; फ्लायदुबईच्या भारतीय कॅप्टनमुळे टळला मोठा अपघात, नेमकं काय घडलं?

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ठाण्यात तणाव; आदित्य ठाकरे, संजय राऊत कापूरबावडी पोलिस ठाण्यात

Pune Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव टँकरचा थरार; दुचाकीला धडक देऊन चालक फरार, २१ वर्षीय तरुण ठार

Latest Marathi News Live Update : पुण्यात दोन ऑक्टोबर रोजी होणारे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

SCROLL FOR NEXT