pune municipal corporation Sakal
Election News

Pune Election: प्रभागरचनेवर होणार २४ व २५ फेब्रुवारीला सुनावणी

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत ५८ प्रभाग आहेत. त्यांचा प्रारूप आराखडा १ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेवर साडे तीन हजारपेक्षा जास्त हरकती-सूचना आल्याने एकाच दिवशी त्यावर सुनावणी घेणे शक्य नाही. त्यामुळे २४ व २५ फेब्रुवारी रोजी गटागटाने बालगंधर्व रंगमंदिर येथे सुनावणी होणार आहे. त्यासाठीचे वेळापत्रक महापालिकेच्या निवडणूक शाखेने जाहीर केले आहे. (Pune Corporation Election Updates 2022)

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत ५८ प्रभाग आहेत. त्यांचा प्रारूप आराखडा १ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. त्यावर १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती-सूचना नोंदविण्यात आल्या आहेत. १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतून ३ हजार ५९६ हरकती सूचना आलेल्या आहेत. या हरकती सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याची माहिती व हरकतदारांच्या नावानुसार सुनावणीचे वेळापत्रक महापालिकेच्या www.pmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे, अशी माहिती निवडणूक शाखेचे उपायुक्त अजित देशमुख यांनी दिली.

तारीख प्रभाग क्रमांक सुनावणीची वेळ

२४ फेब्रुवारी २०२२ - १ ते ९ - सकाळी १० ते ११.३०

- १० ते १६ - सकाळी ११.३० ते दुपारी १

- १७, १८,१९, २०,३०,३१,३३,३५ - दुपारी २.३० ते ४

- २७, २८, २९ - सायंकाळी ४ ते ६

-----------------------------------------------------------------------------

२५ फेब्रुवारी २०२२ -२१,२२,२३,२५,२६,४१,४२,४३,४४,४५,४६ -सकाळी १०ते ११.३०

- ३७,३८,३९,४० -सकाळी ११.३० ते दुपारी १

- ४७,४८,४९,५०,५७ - दुपारी २.३० ते ४

- ५१,५३,५४,५५,५६ - दुपारी ३.३० ते४.३०

- सर्वसाधारण हरकती-सूचना - सायंकाळी ४.३०ते ६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fire News: कोलकातामध्ये मोठी दुर्घटना! प्रसिद्ध आनंदलोक रुग्णालयात मोठी आग; अनेक मजले आगीच्या भक्ष्यस्थानी

Sharad Pawar health update : शरद पवारांचा बारामती दौरा अचानक रद्द, ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंची माहिती

Latest Marathi News Live Update : टीसीएस प्रकरणात धक्कादायक खुलासे, पीडितेच्या फिर्यादीत गंभीर आरोपांची मालिका

Latur Well Death Case : लातूर हादरलं! पोटच्या दोन चिमुकल्यांसह आईनं ग्रामपंचायत कार्यालयाजवळील विहिरीत घेतली उडी, पहाटे 5 वाजता काय घडलं?

मुंबईत राडा! माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणच्या सासऱ्यांसह तिघे अटकेत, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT