Rajasthan Election 2023 
Election News

Rajsthan Election 2023: राजस्थान सरकार शेण-गोमुत्र करणार खरेदी; प्रचाराच्या रणधुमाळीत गेहलोत सरकारचा निर्णय

राजस्थानात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पाली : राजस्थानात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. एकापेक्षा एक आश्वासनं निवडणुकीत उतरलेल्या सर्वच पक्षांकडून दिली जात आहेत. यामध्ये आता सत्ताधारी गेहलोत सरकारनं मतदारांना आकर्षित करण्यासाठी एक निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शेण आणि गोमुत्र खरेदी केलं जाणार आहे. (Rajsthan Assembly Election 2023 Gehlot govt will buy dung and cow urine)

शेण-गोमुत्र खरेदी करणार

राजस्थानातील पाली इथं एका सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटलं की, "सरकारनं एक निर्णय घेतला आहे की, आता गाय आणि म्हशीचं शेण २ रुपये प्रतिकिलो दरानं खरेदी केलं जाईल. यापासून खत तयार केलं जाईल ज्याचा वापर शेतांमध्ये केला जाईल. यापासून बायोगॅसही तयार केला जाईल. तसेच गोमुत्रापासून औषधं तयार केली जातील" (Latest Marathi News)

निवडणुकीत किती होणार फायदा?

शेतकऱ्यांना उत्पन्नाच साधन आणि धार्मिक आस्था अशा दोन्ही अँगलनं विचार करत सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतला आहे. आता मतं मिळवण्याच्या दृष्टीनं या निर्णयाचा किती फायदा गेहलोत सरकारला होतो हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. (Marathi Tajya Batmya)

25 नोव्हेंबरला मतदान

दरम्यान, सध्या राजस्थानात निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू आहे. २५ नोव्हेंबर रोजी इथं मतदान पार पडणार आहे. तर ३ डिसेंबर रोजी याचा निकाल जाहीर होईल. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानुसार, ४९० उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळं आता एकूण १८७५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

SCROLL FOR NEXT