Rajasthan Assembly Election 2023 vasundhara raje ashok gehlot contacted rebels candidates bjp and congress  
Election News

Rajasthan Election 2023 : राजस्थानमध्ये बंडखोरांचा भाव वाढला; निकालापूर्वी वसुंधरा राजे, गहलोतांचे अपक्ष उमेदवारांना फोन

राजस्थान विधानसभा निवडणूकीचे निकाल रविवार (३ डिसेंबर) रोजी जाहीर होणार आहेत.

रोहित कणसे

राजस्थान विधानसभा निवडणूकीचे निकाल रविवार (३ डिसेंबर) रोजी जाहीर होणार आहेत. राजस्थानमध्ये भाजपचे सरकार येणार असल्याचे अनेक एक्झिट पोलमध्ये सांघण्यात आले आहे, तर काहींमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्या बरोबरीचा सामना होईल असे सांगण्यात आले आहे. काँग्रेस भाजपपेक्षा थोडा वरचढ राहण्याची शक्याता एक्झिट पोलमध्ये दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांचे नेते सक्रिय झाले आहेत. भाजपकडून स्वतः वसुंधरा राजे यांनी खुद्द मैदानात उतरल्या आहेत. तर काँग्रेसकडून अशोक गेहलोत मैदानात आहेत.

दोन्ही नेते अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधण्याचा प्रय्तन करत आहेत, दोघांकडून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी जोर लावला जात आहे. यादरम्यान वसुंधरा राजे शिंदे यांनी शुक्रवारी सांचौरचे माजी आमदार आणि यावेळी अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले जीवाराम चौधरी यांना फोन करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जीवाराम चौधरी यांनी वसुंधरा यांना विजयाचे सर्टिफीकेट घेऊन जयपूरला येत असल्याचे सांगितले. जालोर येथील सांचौर विधानसभा जागेवर भाजपमधून बंड करत जीवाराम चौधरी यांनी लागोपाठ दुसऱ्यांदा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे.

जीवाराम सांचौर यांच्या विरोधात काँग्रेसचे सुखराम विश्नोई हे उभे आहेत. त्यांनी अशोक गहलोत यांचा देखील फोन आला होता. दरम्यान जीवाराम चौधरी यांचा समर्थक दावा करत आहेत की त्यांना मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचादेखील फोन आला होता. गहलोत यांनी जीवाराम यांना जयपूरमध्ये भेट घेण्यास सांगितले होते. याबद्दल विचारणा केली असता, जीवाराम चौधरी यांनी ते ३ डिसेंबर रोजी आपली भूमिका स्पष्ट करतील असे त्यांनी सांगितले आहे, सांचौरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असलेले जीवाराम चौधरी यांच्या विजयाची शक्यता आहे, त्यामुळे जयपूरमधून मुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री त्यांना फोन करत आहेत.

बाडमेर जिल्ह्यात भाजपचे बंडखोर नेते रविंद्र भाटी आणि प्रियंका चौधरी यांच्याशी पक्षांच्या नेत्यांनी संपर्क साधला आहे, काँग्रेसकडून देखील यांना संपर्क करण्यात आला आहे. काँग्रेसने इतर दोन बंडखोरांवर देखील भाजपाचे लक्ष आहे. तज्ज्ञांच्या मते बाडमेर जिल्ह्यातून कमीत कमी शिव विधानसभा जागेवरून बंडखोर उमेदवाराचा विजय निश्चित आहे.

बाडमेर आणि सिवाना विधानसभा जागेवरून बंडखोर उमेदवार जिंकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तीन्ही उमेदवारांशी काँग्रेस आणि भाजप यांच्याकडून संपर्क साधला जात आहे. आज तकच्या रिपोर्टनुसार भाजपचे राजेंद्र राठोड यांच्यापासून वसुंधरा राजे आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गहलोत सतत रविंद्र सिंह भाटी यांच्या संपर्कात आहेत. राजस्थानची सर्वात हॉट सीट शिव विधानसभा सीट वरून भाजपचे बंडखोर रविंद्र सिंह भाटी आणि काँग्रेसचे बंडखोर फतेह खान यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT