Narendra Modi  esakal
Election News

Rajasthan Election : ''३ डिसेंबर, काँग्रेस छू मंतर'' पंतप्रधान मोदींचा विश्वास, म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा

भरतपूर (राजस्थान) : ‘‘काही जण स्वत:ला जादूगार समजतात. परंतु आता राजस्थानची जनता हेच म्हणेल, की ३ डिसेंबर.. काँग्रेस छू मंतर. राजस्थानमध्ये सर्वत्र एकच नारा ऐकू येत आहे. भाजप सरकार येत आहे,’’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अशी घोषणा केली.

राजस्थानच्या भरतपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय संकल्प सभेला मार्गदर्शन केले. येत्या २५ नोव्हेंबरला मतदान होत असून प्रचाराला काही दिवस राहिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलेात यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. राजस्थानातील मुली, भगिनींवर आणि दलितांवर अत्याचार झाले आणि सरकार मात्र मूग गिळून गप्प आहे. होळी, रामनवमी आणि हनुमान जन्मोत्सवासह कोणताही उत्सव शांततेने साजरा करता आले नाहीत. काही ठिकाणी हिंसाचार, दगडफेक झाली तर काही भागात संचारबंदी होती.

ज्या ठिकाणी कॉंग्रेसचे सरकार आहे तेथे दहशतवादी, गुन्हेगार आणि समाजकंटक मोकाट सुटलेले असतात. कॉंग्रेससाठी लांगूलचालनच धोरण आहे. यासाठी ते कोणाचाही जीव धोक्यात घालतात, असा आरोप पंतप्रधानांनी केला. जनतेने मोठ्या विश्‍वासाने कॉंग्रेसच्या हाती सत्ता सोपविली होती. मात्र सत्तेत आल्यानंतर कॉंग्रेसने राजस्थानची वाट लावली. विकासाच्या ऐवजी राजस्थानला मागे ढकलले, असं मोदी म्हणाले.

राजस्थानात भाजपने अलीकडेच संकल्पपत्र जारी केले. त्यावर मोदी यांनी संकल्पपत्र तयार करणाऱ्या टीमचे कौतुक केले आणि संकल्पपत्रात दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्याचीही हमी आपण देत आहोत, असे मोदी म्हणाले. भ्रष्टाचारावर प्रहार करण्याचा भाजपचा संकल्प आहे. माता भगिनींना सुरक्षित वातावरण देण्याचे काम भाजप करेल, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. मुख्यमंत्री गेहलोत यांना दिल्लीत बसलेले कॉंग्रेसचे नेतेही घाबरत आहेत, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill on IND vs SL Draw: "२५० षटकं अन् सलग तीन दिवस फिल्डिंग..." फॉलोऑननंतरही सामना ड्रॉ राहिल्याबद्दल गिल काय म्हणाला?

Marathi News Live Updates : टीएमसी कार्यालयात गोंधळ उडाला

Manora News : कृषी केंद्राचा परवाना रद्द न करण्यासाठी २५ हजारांची लाच; मंडळ कृषी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Hotel Business : हॉटेल व्यवसायाला ग्राहकांच्या अविश्वासाचा फटका! एफडीए कारवाईनंतर शहरातील रेस्टॉरंटमध्ये २० टक्क्यांपर्यंत घट

Pune News : स्थायी समितीतील निर्णय फिरवला! टक्केवारीच्या ‘दुर्गंधी’ने स्वच्छ सेवक साहित्याविना

SCROLL FOR NEXT