Manipur Assembly elections Result 2022 esakal
Election News

Manipur : शिवसेना-राष्ट्रवादीपेक्षा आठवले ठरले सरस; रिपाइंच्या उमेदवाराची आघाडी

सकाळ डिजिटल टीम

..तर रिपाइंचा पाच दशकानंतरचा महाराष्ट्राबाहेरच्या राज्यातील हा पहिलाच विजय असेल.

Manipur Assembly elections Result 2022 : लोकसभेची (Lok Sabha Election) सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या मणिपूरच्या या निवडणुकीत 60 जागांसाठी मतदान झालं असून एकूण दोन टप्प्यांत मतदान पार पडलंय. पहिला टप्पा 28 फेब्रुवारी, दुसरा टप्पा 5 मार्च रोजी पार पडला. आज मतमोजणी सुरुय.

मणिपूरसह पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल गुरूवारी सकाळपासून हाती येऊ लागले. यात भाजपा बहुमताच्या आकड्याजवळ आहे, तर भाजपाला टक्कर देण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेस खूप कमी जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळं भाजपाचं 'पुरेपूर मणिपूर' हे स्वप्न पुन्हा सत्यात उतरताना दिसतंय. तर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या पक्षाला महाराष्ट्रात विधानसभा (Maharashtra Assembly) निवडणुकीत फारसं यश मिळताना दिसत नाही. मात्र, मणिपूरमध्ये (Manipur) रिपाइंचा एक उमेदवार आघाडीवर आहे. ही आघाडी कायम ठेवून रिपाइंच्या उमेदवारानं बाजी मारली तर रिपाइंचा पाच दशकानंतरचा महाराष्ट्राबाहेरच्या राज्यातील हा पहिलाच विजय असेल.

किशमथोंग विधानसभा मतदारसंघातून रिपाइंचे उमेदवार महेश्वर थौनॉजम निवडणूक लढवत आहेत. त्यांनी या मतदारसंघात 403 मतांनी आघाडी घेतलीय. तर, अपक्ष उमेदवार सपम निशिकांत सिंग यांना त्यांनी पिछाडीवर टाकलंय. त्यामुळं या मतदार संघात रिपाइंचे महेश्वर विजयी होतात का? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT