KCR esakal
Election News

Telangana Election : केसीआर यांची संपत्ती किती? निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये दिली माहिती

सकाळ वृत्तसेवा

हैदराबादः तेलंगणचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची मालमत्ता ५९ कोटी रुपये असून त्यांच्यावर २५ कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे सांगितले आहे. त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार राव यांच्या नावे कोणतीही चारचाकी गाडी नाही.

राव यांच्याविरोधात नऊ खटले सुरू असून हे सर्वही खटले स्वतंत्र तेलंगणाच्या स्थापनेसाठी केलेल्या आंदोलनावेळचे असून, अद्यापपर्यंत कोणत्याही खटल्यात त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले नसल्याचे त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

राव यांची पत्नी शोभा यांच्याकडे सुमारे सात कोटीची जंगम मालमत्ता असून त्यांच्या हिंदू अविभक्त कुटुंबाकडे नऊ कोटींची संपत्ती आहे. शोभा यांच्याकडे २.८१ किलोचे सोन्याचे दागिने आणि सुमारे १.५ कोटींची मौल्यवान हिरे आणि अन्य दागिने आहेत. त्याचप्रमाणे राव यांच्या स्थावर मालमत्तेचे सध्याचे बाजार मूल्य हे ८.८० कोटी असून त्यांच्या अविभक्त हिंदू कुटुंबाच्या स्थावर मालमत्तेचे बाजरमूल्य १५ कोटी रुपये असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

राव यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या स्वतःच्या नावे जरी मोटार नसल्याचे सांगितले असले तरी त्यांच्या कुटुंबाकडे विविध मोटारी आणि ट्रॅक्टर असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

रामाराव यांच्याकडूनही प्रतिज्ञापत्र

के. चंद्रशेखर राव यांचा मुलगा आणि बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष के.टी. रामाराव (केटीआर) यांच्याकडे ५४.२७ कोटींची संपत्ती आहे. केटीआर यांची पत्नी शैलिमा यांच्याकडे २६.४ कोटींची जंगम मालमत्ता आहे. तसेच केटीआर यांच्या स्थावर मालमत्तेचे बाजारमूल्य १० कोटी ४० लाख रुपये आहे.

धरणी पोर्टलवरून आरोप-प्रत्यारोप

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या महत्वाकांक्षी धरणी पोर्टलवरून तेलंगणात जोरदार आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. २०२०मध्ये केसीआर यांच्या सरकारने तेलंगणमधील जमिनींच्या नोंदी सुसूत्र पद्धतीने ठेवण्यासाठी आणि नोंदींच्या डिजिटायझेशनसाठी हे पोर्टल सुरू केले असल्याचे म्हटले आहे. मात्र या पोर्टलच्या माध्यमातून जमिनींवर ताबा मिळविला जात असल्याचा आरोप तेलंगणमधील विरोधी पक्षांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Dhule Traffic : धुळे वाहतूक कोंडी सुटली! गडकरींच्या निर्देशानंतर फागणे-धुळे वळण रस्त्याची एक बाजू १५ ऑक्टोबरपर्यंत खुली होणार

District Judge Dismissed: माेठी बातमी!'सातारा जिल्हा न्यायाधीश बडतर्फ'; तीन ऑक्टोबरपासून पदमुक्त, नेमकं काय कारण?

Irani Cup 2025: विदर्भाने पटकावला विजेतेपदाचा मान; इशान किशन, पाटिदार, ऋतुराजसारखे स्टार खेळाडू असलेल्या संघाला केलं पराभूत

SCROLL FOR NEXT