pm narendra modi esakal
Election News

Telangana Election : तेलंगणमध्ये मोदींच्या आज दोन सभा; तिरुपती बालाजी मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद

VIP darshan closed at Tirupati Balaji Temple

संतोष कानडे

Telangana Assembly Election 2023 : तेलंगणातील ११९ विधानसभा मतदारसंघासाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. प्रचाराच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणमध्ये आहेत. राज्यात त्यांच्या दोन प्रचारसभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी तिरुपती बालाजीचं दर्शन घेणार आहेत. सकाळी ८ वाजता पंतप्रधानांचं दर्शन आणि पुजा होईल. पंतप्रधानांची सुरक्षा पाहता मंदिर प्रशासनाकडून VIP दर्शन बंद करण्यात आलेलं आहे. भगवान बालाजीच्या दर्शनानंतर मोदी महेबुबाद आणि करीमनगर येथे सभेला संबोधित करतील.

सोमवारी सायंकाळी ५ वाजता मोदींचा हैदराबादमध्ये रोड शो होणार आहे. मोदी यांच्या तेलंगणा दौऱ्याचा सोमवारचा तिसरा दिवस असून मोदी सायंकाळी दिल्लीकडे रवाना होणार आहेत. मागच्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर मोदी काय बोलतात, हे बघावं लागेल.

तेलंगणा निवडणुकीत उतरलेल्या पक्षांची मुख्य लढत 'बीआरएस'सोबत असली तरी काँग्रेस आणि भाजपने ज्या पद्धतीने राजकीय वातावरण केलं आहे, त्यावरुन इतर राज्यांत आणि लोकसभा निवडणुकीतदेखील त्याचे परिणाम दिसून येतील, असं सांगितलं जात आहे.

भाजपने तेलंगणामध्ये जाहीरपणे मुस्लिमांचं चार टक्के आरक्षण काढून घेण्याची घोषणा केली. तर काँग्रेसने एम फॅक्टरच्या माध्यमातून मोठी खेळी केल्याचं दिसून येतंय. राजकीय विश्लेषक सांगतात की, राज्यात निवडणुकीचा निकाल काहीही येवो परंतु एम फॅक्टरच्या अनुषंगाने देशातल्या वेगवेगळ्या राज्यांत तेलंगण निवडणुकीचा प्रभाव पडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Live Updates Marathi: जंतरमंतरवर पोलिसांचा पुन्हा लाठीचार्ज

Panshet Flood Affected : पुण्यातील ६० हजार विस्थापित नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न अखेर सुटला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

CJP Protest: राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेला जे.पी. नड्डांचं उत्तर; काँग्रेस सत्तेत असलेल्या राज्यातील पेपरफुटीचा वाचला पाढा

IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...

Stray Dog Attack : सहा महिन्याच्या झोपलेल्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT