kcr esakal
Election News

Telangana Result 2023: तेलंगणात भाजप ठरली काँग्रेसची 'B' टीम? केसीआर यांना दाखवलं आस्मान

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपचा विजय होतोय तेलंगणात काँग्रेसचा विजय होईल अशी स्थिती आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Telangana Result 2023: देशातील चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपचा दणदणीत विजय झाला. मात्र, तेलंगणात त्यांना विजय मिळवता आला नाही, इथं काँग्रेसचा विजय झाला. पण काँग्रेसच्या विजयाला भाजपचं कारणीभूत ठरला आहे. त्यामुळं भाजप काँग्रेसची बी टीम ठरली आहे. (Telangana assembly election result 2023 BJP became B team of Congress defeat KCR)

भाजपच्या अंतर्गत चर्चेत ठरलं

भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी माध्यमांशी चर्चा करताना या मुद्द्यावर भाजपच्या अंतर्गत निवडणूक चर्चांबाबत खुलासा केला आहे. तावडेंनी म्हटलं की, "तेलंगणात मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळी गृहमंत्री अमित शहा, अध्यक्ष जेपी नड्डा आणि आम्ही चर्चा करत होतो, तेव्हा आम्हाला स्पष्टपणे छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशात आपणचं येऊ आणि तेलंगणात काँग्रेसचं सरकार येईल, असं म्हटलं होतं. कारण आपण केसीआर यांच्याविरोधात जो प्रचार केला त्याचा फायदा आपल्याला न होता काँग्रेसला होईल, हे विश्लेषण आमच्या अंतर्गत बैठकीत आलंच होतं" (Latest Marathi News)

भाजपनं केसीआर यांना घेरलं

दरम्यान, तावडेंच्या या विधानावरुन तेलंगणात सत्ताधारी बीआरएस आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या पराभवासाठी भाजपनं स्ट्रॅटजी तयार केली. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन काँग्रेसनं केसीआर यांना वारंवार घेरलं. त्याचाच परिणाम म्हणून तेलंगणात २०१८ भाजपकडं १ जागा होती त्यावरुन आता २ जागा जिंकल्या तर इतर ६ जागांवर आघाडीवर आहे. (Marathi Tajya Batmya)

म्हणजेच या जागाही जिंकल्या तर भाजपच्या खात्यात ९ जागा होऊ शकतात. म्हणजेच केसीआर यांच्याविरोधातील प्रचारामुळं भाजपला चांगलाच फायदा झाला असला तरी त्यामुळं काँग्रेसला भाजपकडून विरोध कमी झाला. याचीच परिणीती काँग्रेसला सर्वाधिक ६४ जागांवर आघाडीवर आहे, तर बीआरएस ३९ जागांवर आघाडीवर आहेत.

भाजप ठरली काँग्रेसची बी टीम?

म्हणजेच काँग्रेसच्या विजयाला थेटपणे भाजप कारणीभूत ठरली असल्याचं राजकीय विश्लेषणांकडून आणि खुद्द भाजपच्या गोटातून बोललं जात आहे. त्यामुळं एकाअर्थी तेलंगणात भाजप हा काँग्रेसची बी टीम ठरल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanraj Andekar vs Govind Komkar: नाना पेठेत थरार! वर्षभरानंतर बदला घेतला, नेमकं काय होतं वनराज आंदेकर प्रकरण?

Bhagwant Mann health Update: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली ; मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल!

Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

SCROLL FOR NEXT