Rahul Gandhi  Esakal
Election News

Telangana Election : राहुल गांधींनी मागासवर्गीयांचा अपमान केल्याचा भाजपचा आरोप; निवडणुकीत वातावरण तापलं

सकाळ वृत्तसेवा

हैदराबादः तेलंगणात सत्तेत आल्यास मागासवर्गातील नेत्याला मुख्यमंत्री केले जाईल, या भाजपच्या घोषणेनंतर राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री जी. किशनरेड्डी यांनी रविवारी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल यांनी मागास वर्गीयांचा अपमान केला असल्याचा दावा रेड्डी यांनी केली आहे

तेलंगणातील मुख्यमंत्रिपदाच्या भाजपच्या घोषणेबाबत राहुल यांना विचारले असता, भाजप राज्यात अल्पमतात असताना भाजप राज्यात मागास वर्गातील मुख्यमंत्री कसा बनविणार आहे? असा सवाल राहुल यांनी उपस्थित केला होता. याला प्रत्युत्तर देताना रेड्डी म्हणाले की, राज्यातील ५५ टक्के मागास वर्गीयांनी ठरवले असता काहीही शक्य होऊ शकते.

हैदराबाद येथील प्रेस क्लबमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रेड्डी म्हणाले, राहुल गांधी ज्यापद्धतीने बोलत होते ते मागासवर्गीयांचा अपमान करणारे होते. याउलट भाजपने मागासवर्गीयांना मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी बोलताना त्यांनी बीआरएसवर देखील टीका केली. तेलंगणाचे मुख्यमंत्री हे काँग्रेसनिर्मित नेते असून या विधानसभा निवडणुकीत गजवेल आणि कामरेड्डी या दोन्ही मतदार संघातून पराभव होईल असा दावाही रेड्डी यांनी केला आहे.

जाहीरनामा लवकरच- रेड्डी

भाजप तेलंगणमधील विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच जाहीरनामा प्रसिद्ध करेल, असे रेड्डी यांनी सांगितले. निवडणुकीतील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतर जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची भाजपची पद्धत असल्याचेही रेड्डी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Politics: इराणच्या सत्तेत मोठी खळबळ! खामेनेईंविरोधात घरातूनच बंड? नातलगाने मांडला 'नवीन सरकार'चा आराखडा

Marathi News Live Updates : जालन्यात महाविद्यालयाचा स्लॅब कोसळला, एका मजुराचा मृत्यू

NEET paper leak: 'नीट'च्या प्रश्नपत्रिका NTAच्या तज्ज्ञांनीच फोडल्याचा सीबीआयचा निष्कर्ष? 'सप्लाय चेन'बाबत तपासात धक्कादायक माहिती

Nagpur Crime : निर्भयच्या घरात आढळला सुऱ्या, चॉपर, लॅपटॉप अन् गर्भनिरोधकांचा साठा

Akola News : काँग्रेसचे विशेष निरीक्षक डॉ. अभय पाटील यांच्या भेटीला! पक्ष सोडू नये; तक्रारी दूर करण्याचे आश्वासन

SCROLL FOR NEXT