Telangana Election esakal
Election News

Telangana Election : निवडणुकीत २३ टक्के उमेदवार ‘कलंकित’, ‘एडीआर’ची माहिती; २५ टक्के उमेदवार कोट्यधीश

एकूण उमेदवारांपैकी २५ टक्के उमेदवार कोट्यधीश असल्याचेही ‘एडीआर’ने अहवालात नमूद केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : तेलंगणमधील २३ टक्के उमेदवारांवर विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) संस्थेकडून आज देण्यात आली. दरम्यान एकूण उमेदवारांपैकी २५ टक्के उमेदवार कोट्यधीश असल्याचेही ‘एडीआर’ने अहवालात नमूद केले आहे.

येत्या ३० तारखेला तेलंगणमध्ये ११९ जागांसाठी मतदान होत असून त्यासाठी २ हजार २९० उमेदवार रिंगणात आहेत. यातील २३ टक्के उमेदवारांवर कोणत्या ना कोणत्या स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसच्या ७२ टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल असून यातील ५१ टक्के गुन्हे गंभीर प्रकारचे आहेत. दुसरीकडे भाजपच्या ७१ टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल असून यातील ४९ टक्के गुन्हे गंभीर प्रकारचे आहेत. २०१८ च्या निवडणुकीवेळी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांचे प्रमाण १३ टक्के इतके होते.

यावेळी ते वाढून १५ टक्क्यांवर पोचले आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये हत्येचे सात गुन्हे, हत्येचा प्रयत्न केल्याचे २७ गुन्हे तर महिलांविरोधात अत्याचार केल्याचे ४५ गुन्हे दाखल आहेत. २०१८च्या निवडणुकीमध्ये कोट्यधीश उमेदवारांचे प्रमाण २५ टक्के इतके होते. यावेळी निवडणुकीत हे प्रमाण तितकेच आहे. सर्व उमेदवारांच्या संपत्तीची सरासरी ४.७१ कोटी रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे ४१.४८ टक्के उमेदवारांची संपत्ती दहा लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Free Education: JEE-NEET साठी आता मोफत कोचिंग! घरबसल्या IIT प्रोफेसर्सकडून फ्रीमध्ये शिका; जाणून घ्या कुठे?

नाशिकमध्ये नवं कांड! तुरुंगात मदतीसाठी 'ओली पार्टी', ३ अधिकाऱ्यांनी आरोपींसोबत ढोसली दारू; तोतया IPSने आयोजन केल्याचा संशय

IPL 2026, MI vs RR: रोहित शर्मानंतर फक्त 'सूर्या'! मुंबई इंडियन्ससाठी 'असा' विक्रम फक्त दोघांच्याच नावावर

'मृणालने अमेरिकेत बाळाचा एकटीनं सांभाळ केला' काव्याने सांगितला नंदिनीच्या खऱ्या आयुष्यातील गरोदरपणातील अनुभव, म्हणाली...

Latest Marathi News Live Update : इंदापूर तालुक्यातील प्रश्न पेटला, कृषिमंत्री निघून गेल्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

SCROLL FOR NEXT