Telangana Election: Soniya Gandhi Esakal
Election News

Telangana Election : आज मी तुमच्यासमोर हात जोडते.. सोनिया गांधी यांनी केले भावनिक आवाहन

तेलंगण विधानसभा निवडणुकीचा प्रचार मंगळवारी थंडावला

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : तेलंगण विधानसभा निवडणुकीचा प्रचार मंगळवारी थंडावला. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी आज शेवटच्या दिवशी पक्षाला मते देण्याचे आवाहन नागरिकांना केले. सोनिया गांधी यांनी आज प्रथमच काँग्रेसचा प्रचार केला. व्हिडिओ संदेशाद्वारे त्या म्हणाल्या, ‘‘मी तुमच्याकडे येऊ शकले नाही. पण तुम्ही सर्व माझ्या हृदयाजवळ आहात. तुमच्याशी माझे नाते शब्दांच्या पलीकडील आहे.

आज मी तुमच्यासमोर हात जोडते. मला तुम्हाला काही सांगायचे आहे. तेलंगणातील मातांच्या हुतात्मा मुलांचे स्वप्न पूर्ण होताना मला पाहायचे आहे. ‘दोराला तेलंगणा’चे आपण सर्वजण ‘प्रजाला तेलंगणा’त रूपांतर करू. तुमची स्वप्ने पूर्ण करावीत आणि तुम्हाला प्रामाणिक सरकार देऊ, असे मला मनापासून वाटते.’’

तुम्ही मला सोनिया अम्मा, अशी हाक देऊन मोठा सन्मान दिला आहे. मला आईसमान मानले. या प्रेम आणि आदरासाठी मी तुमची सदैव ऋणी राहीन. तुमच्यासाठी माझ्या मनात कायम समर्पणाची भावना आहे. यावेळी तेलंगणात बदल करण्यासाठी पूर्ण ताकद लावा, असे मी तेलंगणमधील माझ्या भगिनी, मुले-मुली आणि भावांना सांगू इच्छिते, असे म्हणत सोनिया गांधी यांनी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT