UP Election News Updates
UP Election News Updates esakal
Election News

पूर्वांचलच्या राजकारणात आझमगडचा ठसा; सपाच्या 'MY' समीकरणाची खरी कसोटी

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची (UP Election 2022) रणधुमाळी सुरू आहे. पाचव्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून, सहाव्या टप्प्यातील मतदान आज सुरु आहे. तर सातव्या टप्प्याचे मतदान ७ मार्च रोजी होणार आहे. सहाव्या आणि सातव्या टप्प्यात पूर्वांचलच्या जागांवर मतदान होणार आहे. पूर्वांचलच्या राजकारणात आझमगडला (Azamgarh) खूप महत्त्व आहे. याठिकाणचे मतदान ७ मार्चला होणारा आहे. आझमगड जिल्ह्यातील १० विधानसभा जागांवर मुस्लिम आणि यादव (Muslim,Yadav) मिळून एकूण मतदारांची संख्या ५० टक्के आहे. त्यामुळे आझमगडमध्ये सपाच्या (SP) मुस्लिम-यादव युतीची खरी कसोटीचा कस लागणार आहे. म्हणूनच या मतदानाकडे भाजपाचेही (BJP) लक्ष लागून राहिले आहे.

भाजपने अखिलेश यादव यांच्यावर दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केला आहे.

उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये दहशतवाद्यांचा संपर्क वाढल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप करताना आझमगडला दहशतीचा अड्डा, दहशतीची नर्सरी अशी उपमा दिली आहे. २००८ च्या अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात आझमगडमधील ५ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. यूपी निवडणूक रॅलींमध्ये नेत्यांनी आझमगडचा उल्लेख अनेकदा केला. यूपी निवडणूक प्रचारा दरम्यान भाजपने अखिलेश यादव यांच्यावर दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोपही केला आहे.

आझमगडमध्येही ओवेसींचे वर्चस्व सुध्दा दिसून येत आहे. याठिकाणी असदुद्दीन ओवेसींचा पक्ष 'एमडी' समीकरणातून (मुस्लीम-दलित समीकरण) आपले पाय रोवण्याच्या प्रयत्नात आहेत. कारण याठिकाणी मुस्लिम मतदार हे ४४ टक्के आहेत. ही मते जर ओवेसीला मिळाली तर सपा मुस्लीम-यादवांच्या मतावर याचा परीणाम होऊ शकतो. त्यासाठी सपाला आपली पूर्ण ताकद लावावी लागणार आहे.

आझमगड जिल्हा का महत्वाचा

आझमगड मुस्लिमांची संख्या २४ टक्के, यादवांची संख्या २६ टक्के तर दलित मतदारांची संख्या २० टक्के आहे. २०१७ मध्ये भाजपलाही येथून विशेष असे काही हाती लागले नाही. तर फक्त एका जोगेवर समाधान मानाले लागले होते. उर्वरित ४ जागा सपा आणि ४ जागा बहुजन समाज पक्षाला (बसपा) मिळाल्या होत्या. त्यामुळे ही आझमगड जिल्ह्याचा गड कोण राखू शकणार याकडे राजकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT