Pushkar Singh Dhami Esakal
Election News

Uttarakhand l धामींच्या पराभवानंतर CM पदासाठी भाजपातील चार जणांची नावे चर्चेत

मसुरीचे आमदार गणेश जोशी यांचे ही नाव पुढे आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Uttarakhand Election Result 2022 l उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. तर खटीमा विधानसभा निवडणूकीत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांचा पराभव झाला. काॅंग्रेसचे (Congress) भुवनचंद्र कापड़ी (Bhuvan Chandra Kapdi ) यांनी ६५७९ मतांनी त्यांचा पराभव केला. काॅंग्रेसच्या विजयाने आता भाजपाचा (BJP) मुख्यमंत्री पदासाठी नवा चेहरा कोण असणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत धन सिंह रावत, सतपाल महाराज आणि त्रिवेंद्र सिंह रावत यांची प्रामुख्याने नावे समोर आली आहेत. मसुरीचे आमदार गणेश जोशी यांचे ही नाव पुढे आले आहे.

काॅंग्रेसच्या विजयाने आता भाजपाचा मुख्यमंत्री पदासाठी नवा चेहरा कोण असणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

उत्तराखंडमध्ये एकूण ७० जागांपैकी भाजपाने ४७ जागांवर बाजी मारली आहे. राज्यात जर एकच पक्ष स्थापन करायचा असेल तर त्यासाठी ३६ जागा आवश्यक असतात. उत्तराखंडमध्ये काँग्रेसने १३ जागा जिंकल्या आहेत आणि ६ जागा आघाडीवर आहेत. कॉंंग्रेसचा वरिष्ठ नेता आणि मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करणारे हरीश रावत यांना लालकुआं (Lalkuan) मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मोहन सिंग बिश्त यांनी पराभूत केले.

मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने एक जागा जिंकली आहे. तर, स्वतंत्र दोन जागांसाठी आघाडीवर आहेत. २००० सालापासून उत्तराखंडच्या इतिहासात कोणत्याही पक्षाने सलग दोनदा सरकार स्थापन केले नाही. मात्र भाजप आणि काॅंग्रेस सत्तेवर आली आहे. मात्र आजच्या निकालानंतर आता भाजपच इतिहास रचेल यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT