ZP Washim Sakal
Election News

वाशीम : वाढीव गटांमुळे ZP निवडणूक रंगणार; पक्षबदलाचे वारे

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे पडघम वाजायला सध्या सुरुवात झाली आहे.

विरेंद्रसिंह राजपूत

नांदुरा (जि. वाशीम) : आगामी मार्च महिन्यात मुदत संपणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे पडघम वाजायला सध्या सुरुवात झाली आहे. वाढीव लोकसंख्या निकषानुसार जिल्ह्यात वाढीव मतदारसंघ पुनर्रचना होणार असल्याने नांदुरा तालुक्यात एक जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिती गण वाढणार असून वाढीव मतदारसंघात नव्या चेहऱ्यांच्या निवडणुकीत उभे राहण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. तर जुन्या नेत्यांनीही या निवडणुकांकरिता कंबर कसत जनसंपर्कावर भर देण्याला प्राधान्य दिल्याचे दिसून येते. (Washim ZP Election Updates)

वाढीव मतदारसंघ पुनर्रचना कार्यक्रम अंतिम टप्प्यात असल्याने व कोरोनाचा कहरही कमी होत असल्याने मे महिन्याच्या उत्तरार्धात निवडणुकीचा कार्यक्रम आरक्षण काढल्यानंतर केव्हाही लागू शकतो.अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून आहे. निवडणुकीचा ज्वर हळूहळू तापू लागला आहे.उमेदवारीच्या याच भाऊगर्दीत ऐनवेळी पक्षाने तिकीट नाकारल्यास या पक्षातून त्या पक्षात कोलांटउड्या मारणाऱ्यांची लगबग पाहता या निवडणूका यावर्षी मात्र रंगतदार ठरणार आहेत.

नांदुरा तालुक्यात या अगोदर चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गण अस्तित्वात होते. यावर्षी मात्र लोकसंख्या निकषानुसार एक जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिती गण वाढणार असल्याचे संकेत प्राप्त होत असून, वाढीव मतदारसंघ पुनर्रचनेला जिल्हा मुख्यालयात शेवटचा हात फिरविला जात आहे. चार आठ दिवसात वाढीव मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार असून, हरकती मागविल्यानंतर मूर्त रूप देत आरक्षण काढून निवडणुकीचा कार्यक्रम मुदत संपल्याच्या कालावधीपासून एक दीड महिन्यात लागणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे.

त्यानुसार तालुक्यात आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीचा ज्वर हळूहळू तापायला सुरुवात झाली असून, राजकीय पक्षानीही संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.असे असले तरी प्रत्येक पक्षात तिकिटांच्या अपेक्षांचे ओझे उराशी बाळगलेल्या कार्यकर्त्यांची संख्या वाढलेली असल्याने दावेदारी मोठ्या वाढणार आहे. त्यातूनच या पक्षातून त्या पक्षात फक्त उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी अनेकांनी आतापासूनच त्या पद्धतीने फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे.

आरक्षण करणार अनेकांचा अपेक्षाभंग

वाढीव लोकसंख्या निकषानुसार तालुक्यात पाच जिल्हा परिषद गट व दहा पंचायत गण नव्याने अस्तित्वात येणार असल्याचे संकेत प्राप्त होत असल्याने जिल्हा परिषद साठी तीन व पंचायत समिती करिता पाच सर्कल हे पन्नास टक्के राखीव महिला आरक्षणाकरिता राखीव असणार आहेत.सोबतच अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एक जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिती गण आरक्षित निघण्याची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे शक्यतो वडनेर किंवा वसाडी हा जिल्हा परिषद गट त्याकरिता राखीव निघण्याची दाट शक्यता पाहता टाकरखेड,निमगाव व चांदुरबिस्वा गटात आयात उमेदवारांची गर्दी वाढणार आहे.

मतदारसंघ बदलाचा अनेकांना बसणार फटका

नवीन मतदारसंघ पुनर्रचनेनुसार अगोदर असलेले अनेक गावे या मतदारसंघातून त्या मतदारसंघात सामील होणार असल्याने प्रस्थापितांना त्याचा फटका सर्वाधिक बसणार आहे. सोबतच प्रत्येक पक्षात इच्छुकांची गर्दी वाढणार असल्याने तिकीट न भेटल्याची नाराजी अनेकांचा 'गेम' करून जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women T20 World Cup: T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम INDIA ची एन्ट्री पक्की? फक्त 'या' ३ गोष्टी आणि इतिहास घडणार!

Viral Video: ''सगळ्यांना पप्पा आहेत.. मम्मी म्हणत होती दारु पिऊ नका, पण तुम्ही ऐकलं नाही'', वडिलांच्या फोटोसमोर चिमुकलीची नाराजी

Pune Nashik Railway Issue : पुणे–मंचर–नाशिक रेल्वे मार्ग रद्द, उत्तर पुणे जिल्ह्यात नाराजी

Water Scarcity : टंचाईमुळे नाशिक शहरात पाणीकपात; जून-जुलैमध्ये शनिवार बंद, तर ऑगस्टमध्ये दोन दिवसांआड पुरवठा

Citroen Electric Car: ईव्ही क्षेत्रात सिट्रोएनचा मोठा दाव! जास्त फीचर्ससह परवडणारी E-C3X लॉन्च; जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंम्मत

SCROLL FOR NEXT