Election News

Telangana Election : वायएसआर शर्मिलांचा काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा; तेलंगणामधून निवडणूक न लढवण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : आंध्रप्रदेशचे दिवंगत माजी मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांच्या कन्या वायएसआर शर्मिला यांनी तेलंगणामध्ये निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून वायएसआर शर्मिला काँग्रेसमध्ये येणार असल्याचे वृत्त होते. परंतु तेलंगणाच्या स्थानिक नेत्यांनी शर्मिला यांच्या काँग्रेस प्रवेशाला विरोध केल्याने त्यांचा प्रवेश होऊ शकला नाही. त्यांनी सोनिया गांधी व राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतरही स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळे शर्मिला यांचा काँग्रेस प्रवेश टळला.

तेलंगणाच्या निर्मितीला वायएसआर काँग्रेसच्या नेत्यांचा विरोध होता. वायएसआर शर्मिला यांना प्रवेश दिल्यास तेलंगणाचा मतदार नाराज होण्याची शक्यता आहे. यामुळे तूर्तास त्यांना प्रवेश देऊ नये, निवडणुकीनंतर प्रवेशावर विचार करावा, असा प्रस्ताव स्थानिक नेत्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर ठेवला होता. या प्रस्तावाला पक्षश्रेष्ठींनी तसेच शर्मिला यांनी स्वीकारल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

...तर जनता माफ करणार नाही- शर्मिला

वायएसआर शर्मिला यांनी निवडणुकीच्या रिंगणात न उतरता काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले. तेलंगणात जनतेला बदल हवा आहे. आपण निवडणूक लढविल्यास काँग्रेसच्या मतदारांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. या फुटीमुळे काँग्रेसला पराभव पत्करावा लागल्यास इतिहास आपल्याला माफ करणार नाही, असे म्हणत शर्मिला यांनी काँग्रेसच्या पाठिंब्याचे समर्थन केले आहे. विधानसभा निवडणुका संपल्यानंतर वायएसआर शर्मिला यांचा काँग्रेस प्रवेश होणार असून त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्यात येईल, असे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT