Chest pain
Chest pain 
फॅमिली डॉक्टर

छातीतील वेदना

डॉ. बिपीनचंद्र भामरे

छातीत ॲसिडिटीमुळेही दुखू शकते. पण थोडे चालल्यावर, थोडे श्रम केल्यावर धाप लागली, छातीत दुखू लागले तर सावध व्हा. आपल्या हृदयाला रक्तपुरवठा कमी होत असल्याचे शरीर सांगते आहे हे लक्षात घ्या.

अंजायना म्हणजे छातीच्या मध्यभागी, ब्रेस्टबोनच्या खाली होणाऱ्या वेदना. काही जणांना या वेदना जबड्याखाली किंवा डाव्या खांद्यात जाणवू शकतात. या वेदना सहसा शारीरिक श्रमानंतर जाणवतात. शंभर-एक मीटर चालल्यानंतर, पोहल्यानंतर, सायकल चालवल्यानंतर वगैरे. काही जणांना छाती जड झाल्यासारखे वाटते. छातीवर काहीतरी जड वजन ठेवल्यासारखे वाटते. काही जणांना केवळ धाप लागते. खूप घाम येतो. छातीत वेदना होण्यामागे अनेक कारणे आहेत. या वेदना केवळ पित्तामुळेही (ॲसिडिटी) होऊ शकतात. अगदी ॲसिडिटीसारखे साधे कारणही यामागे असू शकते.

अँटासिड घेतल्यानंतर काही मिनिटांतच ॲसिडिटीमुळे होणाऱ्या वेदना थांबतात. काहीवेळा मात्र या वेदनांचा अर्थ केवळ अपचनाहून अधिक धोकादायक असू शकतो. अंजायना म्हणजे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा कमी पडत असल्याने छातीत होणाऱ्या वेदना. या वेदना ॲसिडिटी, गॅस्ट्रोएसोफागिअल रिफ्लक्‍स आजारांत होतात तशाच असतात; त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अंजायना हा दबा धरून बसलेल्या कार्डिओव्हस्क्‍युलर विकाराचा इशारा असू शकतो.

अंजायनामध्ये अस्वस्थता, छातीत वेदना जाणवतात त्या हृदयाला ऑक्‍सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे. याचा परिणाम म्हणून पुढे हृदयाच्या स्नायूंमधील बळ कमी होते. रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे वेदना निर्माण होतात. बहुतेकदा रुग्ण छातीभोवती काहीतरी आवळल्यासारखे वाटल्याची तक्रार करतात. हे खांदे, हात, काहीवेळा जबड्यामधील वेदनांबाबतही होते. तणाव किंवा शारीरिक श्रमांमुळे या वेदना वाढतात आणि काही मिनिटे विश्रांती घेतल्यानंतर वेदना कमी होतात. अंजायनाच्या ॲटॅकची आणखी काही लक्षणे म्हणजे अस्वस्थ वाटणे, मळमळणे, धाप लागणे, पोटात वेदना होणे, अचानक थकल्यासारखे वाटणे.

रक्तवाहिनीत अडथळा येणे आणि परिणामी हृदयाला रक्त व ऑक्‍सिजनचा पुरवठा कमी होणे हे कोरोनरी आर्टरी डिसीज अर्थात सीएडीमुळे होते. सीएडीमध्ये रक्तवाहिन्यांमध्ये हळुहळू प्लाक (चरबीयुक्त घटकांचा थर) साचतो आणि रक्तवाहिनी अरुंद होते. कोरोनरी आर्टरीमध्ये (हृद्‌ रोहिणी) अडथळा निर्माण होण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये स्त्रियांच्या तुलनेत अधिक आहे. काहीवेळा कोरोनरी धमन्यांपासून फुटलेल्या छोट्या धमन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. या अवस्थेला मायक्रोव्हस्क्‍युलर डिसीज (एमव्हीडी) म्हणतात आणि हा तरुणांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येतो.

अंजायनाचे मुख्य प्रकार :
१)     स्थिर किंवा स्टेबल अंजायना म्हणजे काहीशे मीटर चालण्यासारख्या शारीरिक श्रमांमुळे छातीत निर्माण होणाऱ्या वेदना. थोड्या विश्रांतीनंतर या वेदना थांबतात.

२)     अस्थिर किंवा अनस्टेबल अंजायना. यामध्ये वेदना अचानक सुरू होतात आणि काही वेळात त्या खूप वाढतात. अस्थिर अंजायनाचा त्रास विश्रांती घेत असताना किंवा झोपेत, कोणतेही कारण नसताना सुरू होऊ शकतो.

३)     प्रिंझमेंटल अंजायना किंवा कोरोनरी आर्टरी स्पाझ्म. यामध्ये एका किंवा त्याहून अधिक धमन्या आक्रसल्यामुळे तात्पुरत्या स्वरुपाची अस्वस्थता किंवा वेदना निर्माण होतात. पुढे याची परिणती हृदयाच्या स्नायूंना होणारा रक्तपुरवठा थांबवण्यात होऊ शकते. या अचानक निर्माण होणाऱ्या लक्षणाची तीव्रता कमी-जास्त असू शकते. काही वेळा आजाराचे स्वरूप सौम्य, तर काही वेळा गंभीर असू शकते. अगदी टोकाच्या गंभीर प्रकरणात हृदयाला होणारा रक्तपुरवठा पूर्णपणे बंद होऊन रुग्णाचा अचानक मृत्यू झाल्याचीही उदाहरणे आहेत.

मायक्रोव्हस्क्‍युलर अंजायनामध्ये (याला कार्डिॲक सिण्ड्रोम एक्‍सही म्हणतात) कोरोनरी आर्टरीज तपासणीदरम्यान सामान्य आढळतात. त्यामुळे धमन्यांच्या शाखा-उपशाखांमधील अडथळ्यांचा विचार करणे महत्त्वाचे आहे. हे अडथळे लक्षात न आल्यास विकार तीव्र स्वरूप धारण करू शकतो आणि रुग्णाचा मृत्यूही ओढवू शकतो.

काय कराल? 
    या अवस्थेचे स्वरूप वेगवेगळे असू शकेल, त्यामुळे त्याबाबत दक्ष राहा. ईसीजी, टूडी एको कार्डिओग्राफी आणि स्ट्रेस टेस्ट केल्यानंतर निदान केले जाऊ शकते. तुमच्या हृदयरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
    अंजायनाचा ॲटॅक आल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयात, डॉक्‍टरांकडे जा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

Vishal Patil: विश्वजीत कदमच आमचे नेते त्यांना मुख्यमंत्री करणारच, विशाल पाटलांनी सांगितला विजयानंतरचा प्लॅन

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात १६ नेत्यांना नोटीस, सात राज्यांमध्ये पोलिस पोहोचले

Shahrukh Khan : शाहरुखवर अबराम भडकला ; सोशल मीडियावर व्हिडीओ चर्चेत

SCROLL FOR NEXT