फॅमिली डॉक्टर

#FamilyDoctor मनगटाच्या शिरांवर दाब

डॉ. अल्ताफ वारिद, डॉ. पराग संचेती

आपल्या हातांच्या पंजांतील ताकद कमी झाल्यासारखी किंवा पंजा बधिर झाल्यासारखा वाटतो का? कदाचित ‘कार्पल टनेल सिंड्रोम’ झाला असण्याची शक्‍यता आहे. संगणक, मोबाईल यांच्या अतिवापराने अलीकडे हा आजार वाढला आहे. 

आपल्यासाठी सगळेच अवयव महत्त्वाचे असतात. त्यातही हात म्हणजे अतिशय महत्वाचा अवयव. जर तुमच्या हाताच्या पंजाला मुंग्या येत असतील, हात बधीर होत असेल किंवा हाताच्या पंजातील ताकद कमी झाली आहे, असे वाटत असेल तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या. डॉक्‍टरांना तुमच्या हाताला ‘कार्पल टनेल सिंड्रोम’ झाला आहे का याबद्दल विचारणा करा. 

हाताच्या मधल्या शिरेवर दाब पडल्याने ही समस्या उद्भवते. ही मध्य शीर हाताच्या लांबी एवढीच असते. मनगटाच्या मधल्या भागातून ती जाते, त्या भागाला ‘कार्पल टनेल’ असे म्हणतात. या शिरेचा शेवट हातामध्येच होतो. ही मधली शीर करंगळी सोडून उर्वरित सर्व बोटांच्या हालचाली नियंत्रित करते. परिणामी या शिरेला सूज आल्याने कार्पल टनेल अरुंद बनतो.

बहुतांश वेळा सामान्य लोकांना माहित नसते की त्यांना हा आजार का झाला. कार्पल टनेल सिंड्रोम होण्यामागे पुढील कारणे असू शकतात. 

हाताच्या एखाद्या अवयवाची सतत होणारी हालचाल. उदाहरणार्थ, संगणकावर अति प्रमाणात टंकलेखन करणे. आपल्या हालचालींमध्ये मनगटापेक्षा जेव्हा पंजा छोटा असतो तेव्हा ही परिस्थिती उद्‌भवते.

मधुमेह, हायपोथायरॉइड, संधीवात, लठ्ठपणा इत्यादि समस्या.
प्रसूती. 
जर तुम्हाला कार्पल टनेल सिंड्रोम असेल आणि त्यावर वेळेत उपचार घेतले नाहीत, तर त्याची लक्षणे खूप काळापर्यंत दिसू शकतात. या परिस्थितीत हा आजार आणखी गंभीर होऊ शकतो. तसेच अशा वेळी लक्षणे नाहीशी होऊन परत उलटूही शकतात. डॉक्‍टरांनी पूर्वावस्थेतच याचे निदान केले तर त्यावर उपचार करणेही सोपे जाते.

कार्पल टनेल सिंड्रोमची लक्षणे:
कार्पल टनेल सिंड्रोममध्ये हाताच्या तळव्याला किंवा हाताच्या ठराविक बोटांना दाहकता जाणवते, मुंग्या येतात, खाज येते, तसेच संवेदना नष्ट होते. सगळ्यात पहिले लक्षण म्हणजे तुम्हाला तुमचे बोट मरगळून पडल्यासारखे वाटेल आणि रात्री बधीर झाल्याचे जाणवेल. ही परिस्थिती बहुतांश वेळा रात्री किंवा संध्याकाळी उद्भवते, कारण तेव्हा तुमचा हात शिथिलाग्र अवस्थेत असतो.

सकाळी उठल्यावर तुमच्या हाताला मुंग्या जाणवू शकतात किंवा हात बधीर होऊ शकतो. बहुतांश वेळा हा बधीरपणा किंवा मुंग्या खांद्यापर्यंत येतात.

गंभीर स्वरूपाच्या घटनांमध्ये काय होते?
कार्पल टनेल सिंड्रोम जसा जास्त गंभीर होत जातो, तशी हाताच्या पकडीची ताकद कमी कमी होत जाते. याचे मुख्य कारण म्हणजे हातातील स्नायू आखडले जातात. परिणामी एखादी वस्तू पकडताना बोटांच्या हालचालींवर मर्यादा येते. त्यामुळे पेटका (क्रॅंप) येणे, तसेच वेदना होणे याची तीव्रताही वाढत जाते. 
मधली शीर तिच्यावर ताण आल्याने तिची कार्यक्षमता गमावून बसते.त्यामुळे खालील समस्या उद्भवण्याची शक्‍यता असते: 
शिरेचे आवेग पारेषण कमी होते (नर्व्ह इम्पल्सेस)
बोटांमधील संवेदना नष्ट होते
बोटांमधील ताकद आणि समन्वय नष्ट होतो. विशेषतः जेव्हा हाताच्या अंगठ्याचा वापर करून आपण चिमूट पकडतो, तेव्हा हे अधिक जाणवते.
अशा परिस्थितीमध्ये वैद्यकीय सल्ला घेतला नाही तर हाताच्या एखाद्या बोटाची संवेदना किंवा कार्यक्षमता कायमची गमावून बसण्याचा धोका असतो. त्यामुळे डॉक्‍टरांचा सल्ला घेण्यात टाळाटाळ करू नये.

पुढील परिस्थितीमध्ये कार्पल टनेल सिंड्रोम होण्याची शक्‍यता जास्त असते.
काही वैद्यकीय अवस्था कार्पल टनेल सिंड्रोमशी निगडीत असल्याने पुढील आजार असणाऱ्यांना कार्पल टनेल सिंड्रोम होण्याची शक्‍यता असते.
लठ्ठपणा
 आघात
 मधुमेह
 हायपरथायरॉईड
 संिधवात

पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ही समस्या उद्भवण्याची शक्‍यता तीनपट जास्त असते. त्याचे कारण म्हणजे स्त्रियांचे कार्पल टनेल पुरुषांपेक्षा छोटे असते. जेव्हा गर्भधारणेच्यावेळी ही परिस्थिती उद्भवते, तेव्हा प्रसुतीनंतर काही महिन्यात लक्षणे नष्ट होतात. ज्या कामांमध्ये हाताची एकाच प्रकारची हालचाल सतत केली जाते, अशा लोकांना कार्पल टनेल सिंड्रोम होण्याचा धोका असतो. 

पुढील कामे करणाऱ्यांमध्ये हा धोका अधिक दिसून येतो :
 शिवणकाम
 विणकाम
 बॅंकेचा कर्मचारी
 रोखपाल
 केशरचनाकार
 संगीतकार
 टंकलेखक

कोणत्या चाचण्यांद्वारे कार्पल टनेल सिंड्रोम लक्षात येतो?
डॉक्‍टर मनगटाच्या किंवा तळहाताच्या काही हालचाली रुग्णाला करायला सांगून या अवस्थेचे निदान करू शकतात. इएमजी-एनव्हीसी या नावाची चाचणी शिरेची कार्पल टनेलमधील कार्यक्षमता मोजते.

उपचार पद्धती 
 दिनक्रमात बदल : एकच हालचाल सतत असल्याने काही लक्षणे दिसत असतील तर हालचाल करताना थोड्या थोड्या वेळाने विश्रांती घेतली पाहिजे. वेदना होत असल्यास हालचाल थोडी कमी केली पाहिजे. ताणाचे व्यायाम प्रकारही मदत करतात. त्यासाठी आपल्या डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा.

आधार देणे : इजा झालेल्या अवयवाला आधार म्हणून डॉक्‍टर काही साधने वापरण्याचा सल्ला देतात. शिरांवर येणारा ताण कमी होण्यासाठी किंवा अवयवाची हालचाल कमी होण्यासाठी डॉक्‍टर अशी साधने वापरायला सांगतात. बधिरता, मुंग्या कमी होण्यासाठी रुग्ण रात्रीसुद्धा ही साधने वापरू शकतो. यामुळे झोप चांगली होते, तसेच मधल्या शिरेला आराम मिळतो.

औषधे : या अवस्थेत डॉक्‍टर दाहकता कमी होण्यासाठी औषधे किंवा सूज कमी होण्यासाठी स्टेरॉईड्‌स लिहून देतात.

शस्त्रक्रिया : वरीलपैकी कोणतीही उपचार पद्धती उपयुक्त ठरत नसेल तर शस्त्रक्रिया हा शेवटचा पर्याय असतो. शस्त्रक्रियेमध्ये मनगटाजवळील कार्पल टनेलवर असलेला दबाव काढला जातो. शस्त्रक्रियेनंतर काही तासात रुग्ण घरी परत जाऊ शकतो.

स्वतः घ्यायची काळजी:
 आपले मनगट सरळ ठेवा
 आधारासाठी डॉक्‍टरांनी सांगितलेल्या साधनांचा वापर करा
 मनगटाची आखडणे व ताणणे ही हालचाल टाळा
 डॉक्‍टरांकडून व्यायाम जाणून घ्या
 काम करताना आपले हात व मनगट सुयोग्य स्थितीत ठेवा
 रोजची कामे करताना आपण अस्वस्थ होणार नाही याची दक्षता घेऊन कामांचे नियोजन करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nina Kutina: गोकर्णच्या जंगलातील गुहेत सापडलेल्या रशियन महिलेचा शोध कसा लागला? पोलिसांनी सांगितलं सत्य

Mumbai Water Supply: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! शनिवारी १२ तास पाणीकपात; 'या' भागात पाणीपुरवठा बंद

Shravan Upvas Special 2025: श्रावणातील उपवासासाठी बनवा हटके, कुरकुरीत आणि चविष्ट केळी-साबुदाणा कटलेट

Pune Porsche Car Accident : मुलाला प्रौढ ठरवून त्याविरोधात खटला चालविण्याचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन आरोपीस दिलासा

‘सुपर डान्सर चॅप्टर-5’ मध्ये सेंसेशनल सोमांशने दाखवली चमक, आईच्या भक्कम पाठिंब्यामुळे स्वप्न साकार!

SCROLL FOR NEXT