health tips by doctor to better sleep and diabetes patients Sakal
फॅमिली डॉक्टर

तर काय?

आहारातून भात पूर्णपणे वर्ज्य करण्याचा मला डॉक्टरांनी सल्ला दिलेला आहे. प्री डायबेटिक स्टेज असल्याचे सांगितलेले आहे

सकाळ वृत्तसेवा

मला चार वर्षांचा मुलगा आहे. तो शांत झोपत नाही, तसेच दिवसभर चिडचिड करत राहतो. पोटात दुखते असे सांगतो. रात्री झोपेत दात खातो, फार बडबडतो. डॉक्टरांना दाखवून औषधे घेतल्याचा फार परिणाम होताना दिसत नाही. काय उपाय करता येईल?

उत्तर - आपण सांगितलेली बरीच लक्षणे जंतांशी निगडित दिसतात. तसेही लहान मुलांमध्ये जंत होण्याचे प्रमाण जास्ती असते. डॉक्टरांच्या सल्ल्याने वर्ष-सहा महिन्यांतून एकदा तरी जंतनाशक औषधे देणे उत्तम.

चांगल्या दुकानातून वावडिंग आणावे व घरी मिक्सरमध्ये चूर्ण करून भरून ठेवावे. हे चूर्ण साधारण पाव चमचा थोड्या मधात मिसळून ८-१० दिवस सकाळच्या वेळी देणे चांगले. हे शक्य नसल्यास विंडगारिष्ट सकाळ-संध्याकाळ किमान एक महिना द्यावे.

रोज सकाळ-संध्याकाळ संतुलन बाल हर्बल सिरप काही महिने देणे उत्तम राहील. रात्री झोपण्यापूर्वी संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल किंवा संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलाने पोटावर मालिश करणे उत्तम राहील.

घडाळ्याच्या काट्यांच्या दिशेत तेल पोटावर हलक्या हाताने जिरवावे, फार दाब देण्याची गरज नाही. नाभीमध्ये २-३ थेंब तेल घालणे उत्तम. एकूणच आरोग्याकडे लक्ष देण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे जास्त उत्तम ठरेल.

आहारातून भात पूर्णपणे वर्ज्य करण्याचा मला डॉक्टरांनी सल्ला दिलेला आहे. प्री डायबेटिक स्टेज असल्याचे सांगितलेले आहे. तसेच माझे वजनही थोडे जास्त प्रमाणात आहे. माझ्या आई-वडिलांनाही मधुमेहाचा इतिहास आहे. परंतु मला भात मनापासून आवडतो. त्यामुळे भात पूर्णपणे वर्ज्य करावा असे मला वाटत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.

- श्री. सौरभ, सांगली

उत्तर - आयुर्वेदानुसार तांदूळ पचायला अत्यंत हलके असतात. उलट अन्नामध्ये सगळ्यांत पहिला विचार येतो तो तांदळाचा. सध्याच्या काळात सगळ्याच आहाराची प्रत खालावत चाललेली आहे. तांदूळ हायब्रीड तसेच जेनेटिकली मॉडिफाइड प्रकारचे मिळायला लागलेले आहेत.

घरात तांदूळ साठवून ठेवण्याची शक्यता नसल्यामुळे आपण बाजारातून कोणता तांदूळ आणतो आहोत तो किती नवा वा जुना आहे याकडे लक्ष दिले जात नाही. तांदूळ पचायला हलका असतो, त्यातल्या तो जुना असला व शिजवण्यापूर्वी भाजून घेतला तर त्यापासून केलेला भात पचायला अधिकच हलका असतो.

व्यवस्थित शिजवलेल्या भातामुळे आतड्यात मऊपणा राहण्यास मदत मिळते व वात-पित्ताचे शमनही होते. रोज भात खाताना त्यावर साधे वरण, मीठ, साजूक तूप घेणे पचनाच्या दृष्टीने उत्तम.

लिंबू पिळून वरण-भात खाल्ल्याने शरीराला ताकद मिळायला मदत मिळते. त्यामुळे आपल्याला थोड्या प्रमाणात भात खायला हरकत नाही. आपल्या महाराष्ट्रातील आंबेमोहोर, इंद्रायणी, कोलम इत्यादींसारखे देशी तांदूळ आहारात ठेवायला हरकत नाही.

डॉ. मालविका तांबे यूट्यूब चॅनेलवर भातासंबंधी माहिती दिलेली आहे, भात कसा शिजवावा याचाही कृती दिलेली आहे, ती नक्की बघावी. घरात मधुमेहाचा इतिहास आहे व तुम्हीही प्री डायबेटिक स्टेजमध्ये आहात तेव्हा रोज ३५-४० मिनिटे चालायला जाणे व रोज संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलाचा अभ्यंग करणे हा उपाय जास्त चांगला राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Decision: शहरात उपचार सोपे, गावात सुविधा वाढणार... मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोककेंद्रित महत्त्वाचे निर्णय!

Pune Traffic: चांदणी चौकात महामार्ग ओलांडताना जीवघेणी कसरत; प्रवाशांची गैरसोय : पादचारी मार्गाचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : भात पिकाच्या नुकसानीसाठी भरपाईची मागणी; मुळशी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा

IPL 2026 Update: काव्या मारनचा धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत, असं करण्याची खरच गरज आहे का? सनरायझर्स हैदराबाद...

जगात कुठं असं होतं का? प्रकल्प रखडल्यानं फडणवीस कंत्राटदारांवर संतापले, म्हणाले, १५ दिवसात पूर्ण करा

SCROLL FOR NEXT