फॅमिली डॉक्टर

प्रश्नोत्तरे

माझे वय २७ वर्षे आहे. मी चार महिन्यांची गरोदर आहे. मला पोट साफ न होण्याची सवय आधीपासूनच आहे.

सकाळ वृत्तसेवा

माझे वय २७ वर्षे आहे. मी चार महिन्यांची गरोदर आहे. मला पोट साफ न होण्याची सवय आधीपासूनच आहे. आयुर्वेदीय गर्भसंस्कार या पुस्तकात गर्भारपणात पोट साफ होणे आवश्यक असल्याचे वाचले. मला असे विचारायचे आहे की मी सॅनकूल घेतले तर चालेल का? अजून काही उपाय करता येईल का? कृपया मार्गदर्शन करावे.

- सौ. धनश्री लष्करे

उत्तर - गर्भारपणात सॅनकूल घेतलेले चालते. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा सॅनकूल चूर्ण घेण्याने सकाळी पोट साफ होण्यास मदत मिळेल. आहारात ४-५ चमचे घरी बनविलेले लोणकढे साजूक तूप समाविष्ट करणेही चांगले, या शिवाय १०-१२ काळ्या मनुका, दोन चमचे देशी गुलाबाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा सोनामुखी यांचा काढा करून घेण्याचाही उपयोग होईल. काही दिवस नियमितपणे हा उपाय केला तर मलावष्टंभाची प्रवृत्ती पूर्णपणे नाहीशी होते असा अनुभव आहे.

मी सुरुवातीपासून फॅमिली डॉक्टर ही पुरवणी वाचतो. आमच्या घरातील सर्वांना यातील मार्गदर्शनाचा खूप छान उपयोग झालेला आहे. श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या स्वयंपाकघरातील दवाखाना या पुस्तकाचाही छोट्या तक्रारींवर उत्तम उपयोग होत असतो. सध्या ताजे आवळे मिळतात. यांचा वापर कशा पद्धतीने करावा?

- श्री. अरुण नानिवडे

उत्तर - फॅमिली डॉक्टरमधील मार्गदर्शनाचा उपयोग झाल्याचे कळविल्याबद्दल आभार. थंडीच्या दिवसात मिळणाऱ्या आवळ्यांचा स्वयंपाकघरात चटणी, लोणचे, बनविण्यासाठी वापर होतोच, पण घरातील सर्वांसाठी आवळ्याच्या ताज्या रसापासून बनविलेले रसायन उत्तम असते. १-२ आवळ्यांच्या रसात एक चमचा तूप, एक चमचा मध आणि एक चमचा किंवा चवीनुसार खडीसाखर मिसळावी. नीट मिसळून रोज एकदा सेवन करावे. या रसायनामुळे प्रतिकारशक्ती सुधारते, पचनशक्ती वाढते, रक्तशुद्धी होते. घरातील सर्वजण हे रसायन घेऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT