body skin diseases sweat body smells
body skin diseases sweat body smells  sakal
फॅमिली डॉक्टर

प्रश्नोत्तरे

सकाळ वृत्तसेवा

माझा मुलगा नऊ वर्षांचा आहे, त्याच्या चेहऱ्यावर सतत हलके पांढरे डाग येत-जात राहतात. त्याचे वजनही वाढत नाही. तो सतत चिडचिड करत असतो. घरात कुणालाही सर्दी-खोकला-ताप असे त्रास झाले तर त्यालाही लगेच हे त्रास होतात. तो सारखा आजारी पडतो. तो दिवसभर खूप मस्ती करतो, रात्री झोपण्याच्या वेळी पाय दुखतात अशी तक्रार करतो व पाय दाबायला सांगतो. त्याच्या खाण्यापिण्याची काळजी मी बऱ्यापैकी घेत असते. त्याचे जेवण व्यवस्थित आहे. काय करता येईल?...

- अनिता कुलकर्णी, सांगली.

- चेहऱ्यावर पांढरे डाग येण्याची अपचन, अजीर्ण, शरीरात कशाची तरी कमतरता, त्वचारोग अशा बरीच कारणे असू शकतात. त्यामुळे तज्ज्ञांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे अधिक चांगले. तो चिडचिड करतो, त्याची प्रतिकारशक्ती कमी आहे, यासाठी त्याला सकाळ-संध्याकाळ संतुलन बाल हर्बल सिरपसारखे सिरप देणे चांगले होईल.

२-३ महिन्यांतून एकदा दहा दिवसांसाठी जेवणानंतर थोडे पाणी मिसळून विडंगारिष्ट देणे उत्तम. तो दिवसभर खेळतो व रात्री पाय दुखतात याचा संबंध त्याच्या शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे मिळत नसल्याशी असू शकेल. चैतन्य कल्प घालून दूध, जेवणाच्या वेळी वरण-भात, पोळी, आमटी वगैरेंत साजूक तूप टाकणे, मुलांना आठवड्यातून २-३ वेळा घरचे ताजे लोणी खडीसाखरेबरोबर देणे, संतुलन अमृतशर्करायुक्त पंचामृत देणे,

च्यवनप्राश, डिंकाचा लाडू, मॅरोसॅनसारखे एखादे रसायन देणे, कॅल्सिसॅनसारख्या नैसर्गिक कॅल्शियमची पूर्ती करणाऱ्या गोळ्या देणे एकंदर प्रतिकारशक्ती वाढण्याच्या दृष्टीने उपयोगी होऊ शकेल. मुलांना आठवड्यातून १-२ वेळा अभ्यंग करणे उत्तम असते. त्यामुळे शाळेची सुटी पाहून स्नानापूर्वी अर्धा तास संपूर्ण शरीराला अभ्यंग करणे चांगले.

उन्हाळ्याच्या दिवसांत माझ्या अंगाला खूप कुबट वास येतो. हा वास घामाचा नसून काहीतरी आंबवल्यासारखा असतो. याचा माझ्या वैवाहिक जीवनावरही परिणाम होत आहे. मी दिवसातून तीन वेळा अंघोळ करतो, कपडे बदलतो पण तरीही हा त्रास कमी होत नाही. मार्गदर्शन करावे.....

- श्रीरंग भिमाले, सातारा

पित्त प्रकृती असणाऱ्यांमध्ये घाम येण्याचे प्रमाण जास्त असते. हा प्रमाण उन्हाळ्यात वाढलेले दिसते. परंतु घामाला कुबट वा आंबूस वास येणे हे शरीरात रक्तदोष वाढल्याचे द्योतक आहे. खाल्लेले पचले नाही, अजीर्ण झाले, वा पोट साफ झाले नाही तरी घामाला असा वास येऊ शकतो. स्नानाच्या वेळी संतुलन अभ्यंग मसाज पावडरसारखे एखादे नैसर्गिक उटणे वापरणे उत्तम.

हे उटणे संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलात मिसळून संपूर्ण अंगाला लावल्याचा फायदा मिळू शकतो. जेवणांनंतर संतुलन पित्तशांती या गोळ्या, सकाळ-संध्याकाळ संतुलन गुलकंद स्पेशल घेणे उत्तम. शक्यतो या दिवसांत चमचमीत, आंबवलेले, तळलेले पदार्थ खाणे टाळणे बरे असते. या काळात मांसाहार पूर्णपणे टाळावा. लघवी साफ होण्याच्या दृष्टीने शहाळ्याचे पाणी, लिंबू सरबत, पुनर्नवासवसारखे एखादे आसव या काळात नियमित घेणे योग्य ठरेल. शरीराची दुर्गंधी कमी होण्याकरता तसेच शरीरातील आम कमी करण्याच्या दृष्टीने संतुलन पंचकर्मासारखे शास्त्रोक्त पंचकर्म करवून घेणे सुद्धा उत्तम ठरू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याणमधून ठाकरे उमेदवार बदलणार? आणखी एक अर्ज दाखल झाल्यानं चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update : दक्षिण मुंबईतून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

Aranmanai 4 Twitter Review: कुणी म्हणालं, 'ब्लॉकबस्टर' तर कुणी म्हणालं, 'जबरदस्त VFX'; तमन्नाच्या 'अरनमनई 4'नं जिंकली नेटकऱ्यांची मनं

Naach Ga Ghuma Review: 'ती' देखील वर्किंग वूमनच...? हास्य आणि भावनिक क्षणांची रोलर कोस्टर राईड

IND vs PAK T20 World Cup 24 : सामना भारत - पाकिस्तानचा फायदा न्यूयॉर्कच्या हॉटेल्सचा! तब्बल 600 टक्क्यांनी वाढलं रूम्सचं भाडं

SCROLL FOR NEXT