health food child sakal
फॅमिली डॉक्टर

प्रश्नोत्तरे

माझी मुलगी दहावीत आहे. सतत अभ्यासाच्या ताणामुळे व रात्रीच्या जागरणामुळे तिला उष्णतेचा त्रास होतो आहे. तोंड आल्यामुळे तिखट खाणे सहन होत नाही.

सकाळ वृत्तसेवा

माझी मुलगी दहावीत आहे. सतत अभ्यासाच्या ताणामुळे व रात्रीच्या जागरणामुळे तिला उष्णतेचा त्रास होतो आहे. तोंड आल्यामुळे तिखट खाणे सहन होत नाही.

प्रश्र्न १ - माझी मुलगी दहावीत आहे. सतत अभ्यासाच्या ताणामुळे व रात्रीच्या जागरणामुळे तिला उष्णतेचा त्रास होतो आहे. तोंड आल्यामुळे तिखट खाणे सहन होत नाही. ताणामुळे भूक नीट लगत नाही. पचनही नीट होत नाही. काय उपाय करता येईल ते सुचवावे.

- मंजूषा गुरव, नवी मुंबई

उत्तर - परीक्षेच्या दिवसांत तसेच इतर वेळीही अभ्यासाकरता जागरण करणे चांगले नसते. त्याऐवजी सकाळी लवकर उठून अभ्यास करणे अधिक उत्तम. सकाळी केलेला अभ्यास, केलेले पाठांतर अधिक लक्षात राहते. शरीरात उष्णता फार वाढली असल्यास सकाळ-संध्याकाळ संतुलन पित्तशांती गोळ्या, तसेच रात्री झोपण्यापूर्वी सॅनकूल चूर्ण घेण्याचा फायदा होऊ शकेल. पचन व्यवस्थित राहण्याच्या दृष्टीने तसेच शरीरातील उष्णता कमी होण्याकरता संतुलनचा प्रवाळयुक्त स्पेशल गुलकंद घेणे उत्तम ठरेल. सकाळ संध्याकाळ एक-एक चमचा गुलकंद नुसता खाल्ला किंवा गार दुधात घालून मिक्सरमध्ये फिरवून दिल्यास उष्णताही कमी होते तसेच मुलांना स्वादिष्ट पेय पिण्याचा आनंद मिळतो. आठवड्यातून ३-४ वेळा पादाभ्यंग करणे उत्तम ठरेल.

प्रश्र्न २ - माझ्या लग्नाला आठ वर्षे झाली आहेत. तीन वेळा नैसर्गिकरीत्या गर्भधारणा झाली पण बाळाच्या हृदयाचे ठोके नसल्याने तिन्ही वेळा गर्भपात करावा लागला. तपासण्यांमध्ये कुठल्याही प्रकारचे दोष नाहीत असे आढळून आलेले आहे. गरोदर राहून व सुदृढ बाळ जन्माला यावे यासाठी मार्गदर्शन करावे.

- मनीषा दाबके, पुणे

उत्तर - गर्भधारणा नैसर्गिकपणे होणे तसेच गरोदरपणात कुठल्याही प्रकारचा मोठा त्रास न होता सुदृढ बालकाचा जन्म होणे हे खूप महत्त्वाचे असते. आयुर्वेदानुसार यासाठी स्त्री व पुरुष यांचे स्वास्थ्य व त्यांचे बीज व्यवस्थित असणे आवश्यक आहे. हृदयाचे ठोके नीट असणे हा विकासातील पहिला व महत्त्वाचा टप्पा असतो. आपल्या बाबतीत तोच पार पडू शकत नाही याचा अर्थ बीजांमध्ये संतुलन आणणे आवश्यक आहे. याकरता आपण उभयतांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. संतुलनचे शास्त्रोक्त पंचकर्म व उत्तरबस्ती हे उपचार करून घेऊन औषधोपचार व रसायने घेण्याचा फायदा होऊ शकेल. शरीरात वीर्य व्यवस्थित असले तर गर्भधारणेमध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. वारंवार होणाऱ्या गर्भापातामुळे स्त्रीच्या आरोग्याची पातळीही खाली जात असते. त्यामुळे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊन घेऊन नंतरच संततीसाठी प्रयत्न करणे योग्य होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी, जय पवार म्हणाले, बिनविरोधसाठी आमचा प्रयत्न पण...

IPL 2026 : शाsssणा... Rohit Sharma ने कुलदीप, लोकेश यांना 'मामू' बनवलं; प्रसंग सांगताना हिटमॅन खळखळून हसला Video

Latest Marathi News Live Update : मुंबईहून 18 टन ऑटो LPG संभाजीनगरमध्ये जाणार

MI vs DC Live : सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, नमन धीरने मुंबई इंडियन्सची लाज वाचवली; दिल्लीच्या गोलंदाजांसमोर इतरांची शरणागती

"मी पैशांसाठी बिग बॉस केलं" लपंडाव फेम रुपालीचा धक्कादायक खुलासा ; म्हणाली..

SCROLL FOR NEXT