Children Health Sakal
फॅमिली डॉक्टर

प्रश्नोत्तरे

मला चार वर्षांची मुलगी व दीड वर्षांचा मुलगा आहे. मुलांना सुवर्णप्राशन देण्याचे इतके फायदे असतात हे मला आत्तापर्यंत माहिती नव्हते.

सकाळ वृत्तसेवा

मला चार वर्षांची मुलगी व दीड वर्षांचा मुलगा आहे. मुलांना सुवर्णप्राशन देण्याचे इतके फायदे असतात हे मला आत्तापर्यंत माहिती नव्हते. आता मला त्यांना सुवर्णप्राशन संस्कार करण्याची इच्छा आहे. तसे केले तर चालेल का आणि ते कशा प्रकारे करावे?

- सौ. संगीता, बंगळूर

उत्तर - सुवर्णप्राशन संस्कार हा खरे तर आयुष्यभर महत्त्वाचा असतो, परंतु लहान मुलांमध्ये सुवर्णप्राशन संस्कार केल्याने त्यांची एकूणच बौद्धिक क्षमता, रोगप्रतिकारक्षमता, शारीरिक वाढ वगैरे सगळ्यांत चांगला फरक दिसतो असे काश्यपसंहितेत सांगितलेले आहे व तसा अनेकांचा अनुभवही आहे. याचबरोबरीने मुलांना अमृतशर्करायुक्त पंचामृत देणेही सुरू करता येईल. याबद्दलची संपूर्ण माहिती डॉ. मालविका तांबे यूट्यूब चॅनेलवर पंचामृताच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, ती नक्की बघावी.

माझे मूल तीन महिन्यांचे आहे, त्याला दिवसातून ४-५ वेळा शी होते, तसेच दूध पाजल्यानंतर थोडे दूध वरचेवर काढतो. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित ढेकर येतो, तरी अशा प्रकारचा त्रास होताना दिसतो. याचा परिणाम बाळाचे वजन न वाढण्यावर किंवा इतर विकासावर होऊ शकेल का? बाळ खेळकर आहे, व्यवस्थित झोपते. इतर कोणताही त्रास नाही. त्याला संतुलन बालामृत व बाळगुटी सुरू आहे. त्याचबरोबर बेबी मसाज तेलाने अभ्यंग सुद्धा करते.

- सौ. ज्योती मेहता, दादर

उत्तर - लहान मुलांना दिवसातून ४-५ वेळा शी होणे नॉर्मल असते. तसेच दूध पाजल्यानंतर थोडे दूध, थोडे चिकट बाहेर काढणे चिंताजनक नाही. आपण बाळाला रोज मालिश करत असतात, संतुलन बाळगुटी, संतुलन बालामृत देत असलात तर बाळाला पचनाचे त्रास होण्याची शक्यता फारशी नाही. तरीही दुसरे काही चुकीचे आढळल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तुमच्या प्रश्नावरून चिंता करण्याचे काही कारण दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samarjeet Ghatge: समरजीत घाटगे पुन्हा भाजपमध्ये जाणार? तारीखही आली; घरवापसीचं नेमकं कारण काय?

GT vs RR Live : गुजरात टायटन्सचे नेतृत्व राशीद खान याच्याकडे; शुभमन गिल याला नेमकं काय झालं? IPL 2026 मध्ये मोठा ट्विस्ट

सीईटी परीक्षेत संतापजनक प्रकार, पेपरात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, कारवाईची मागणी

Horoscope News : 'या' तारखेपासून शनीदेव बदलणार 5 राशींचं नशीब ! शंकराची होणार कृपा, भाग्योदयाची सुरुवात

Ajit Pawar legacy: बारामतीत जय पवारांचा भावनिक संवाद; अजितदादांच्या आठवणींनी कार्यकर्ते अश्रूनयन, सुनेत्रा पवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT