Sleeping
Sleeping Sakal
फॅमिली डॉक्टर

प्रश्नोत्तरे

सकाळ वृत्तसेवा

मी ३५ वर्षांची आहे. मला रात्री शांत झोप येत नाही. खूप स्वप्ने पडतात. त्यामुळे सकाळी उत्साह वाटत नाही. शांत झोप येण्यासाठी कृपया मार्गदर्शन करावे.

- श्री. चिराग कळंबोले

उत्तर - नियमित अभ्यंग, पादाभ्यंग, नस्य हे शांत झोपेसाठी निश्र्चित कामाला येणारे व घरच्या घरी करता येणारे उपचार होत. यादृष्टीने रात्री झोपण्यापूर्वी संतुलन अभ्यंग तीळ तेलाचा अभ्यंग, शतधौतघृत किंवा संतुलन पादाभ्यंग घृत लावून काशाच्या वाटीने पादाभ्यंग आणि घरी बनविलेले साजूक तूप किंवा नस्यसॅन घृताचे नस्य करण्याचा उपयोग होईल. जटामांसी या वनस्पतीचे चूर्ण तासभर पाण्यात सकाळी भिजवून रात्री झोपण्यापूर्वी गाळून घेऊन प्यावे. यामुळे मनावरचा अतिरिक्त ताण कमी व्हायला मदत मिळते. रात्री झोपण्यापूर्वी निद्रासॅन गोळी तसेच चमचाभर रिलॅक्स सिरप घेण्याचाही फायदा होईल. शांत झोप लागली की सकाळी आपोआप उत्साह वाढेल.

मे महिन्यात मला कोरोना झाला होता. मात्र सॅन अमृत चहा आणि फॉर्म्युला के२ लगेच सुरू केल्याने मला मोठा त्रास झाला नाही. हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची गरज पडली नाही. आता मला तसा काही त्रास नाही, मात्र या दरम्यान माझे ७-८ किलो वजन कमी झाले आहे व त्यामुळे मला अजूनही खूप थकवा जाणवतो. मी संतुलनचे च्यवनप्राश घेते आहे. माझे वय ४० वर्षे आहे. ताकद व वजन वाढण्यासाठी कृपया मार्गदर्शन करावे.

- सौ. गौरी पाटील

उत्तर - सॅन अमृत चहा आणि फॉर्म्युला के२ काढा यांचा अतिशय चांगला गुण आल्याचे आत्तापर्यंत अनेकांनी कळवले आहे. आहार, आचरण व औषध या त्रिसूत्रीची नीट योजना केली तर तब्येत नक्की पूर्वीसारखी होऊ शकेल. या दृष्टीने रोज सकाळ-संध्याकाळ संतुलन धात्री रसायन घेण्यास सुरुवात करावी. च्यवनप्राश घेणे सुरू ठेवावे. संतुलनचे अर्धा चमचा यू. सी. चूर्ण, अर्धा चमचा सितोपलादी चूर्ण, खडीसाखर व तूप मिसळून तयार केलेले मिश्रण सकाळ संध्याकाळ घेण्याने नक्की वजन व ताकद वाढते असा अनुभव आहे. शक्य असेल तेव्हा आहारात चमचाभर घरचे लोणी-साखर घेणे. एरवी रोजच ४-५ चमचे घरचे साजूक तूप किंवा संतुलनचे आयुर्वेदिक घृत घेणे चांगले. यामुळे मेद वाढत नाही, मात्र कमी झालेले वजन आणि ताकद पूर्ववत होण्यास उत्तम मदत मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT