himoglobin.jpg 
फॅमिली डॉक्टर

महिलांनो शरीरात हिमोग्लोबिन कमी तर नाही ना! कारण...

किशोरी वाघ : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्या काही वर्षांत महिलांच्या आरोग्याच्या समस्या वाढत चालल्या आहे. शरीरातील अत्यावश्‍यक घटकांची कमतरता यामुळे सिकलसेल, ऍनेमिया, कॅन्सर, गर्भाशयाचे आजार यांचेही प्रमाण वाढलेले दिसून येते. हिमोग्लोबिन, लोह, प्रथिने यासारख्या घटकांच्या कमतरतेमुळे महिलांच्या आजारात वाढ झाली आहे. बदलती जीवनशैली व आहाराच्या चुकीच्या सवयी यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावण्यास सुरुवात झाली आहे. 

शहरात पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता
शहरातील जवळपास पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असल्याचे आढळून येत आहे. चुकीच्या आहारपद्धती, अतिश्रमाचे कामे, अनियमित आहार, व्रतवैकल्य करणे, पालेभाज्या कमी खाणे याकारणाने हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. स्त्रियांमध्ये हिमोग्लोबीन हे १२ टक्के तर पुरुषांमध्ये इतके १३ टक्के इतके असणे आवश्‍यक असते. हे प्रमाण कमी झाल्यास त्वरित उपचार घेणे आवश्‍यक आहे. स्त्रियांमध्ये मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्राव होणे, गर्भाशयातील हार्मोन्स कमी-जास्त होणे, गर्भाशयातील गाठी यामुळे रक्तस्राव जास्त झाल्यामुळे देखील अशा समस्या उद्‌भवतात. तर काही वेळा कॅन्सरसारख्या आजाराची लागण होत असल्याने देखील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. खासकरुन कॉलेज तरुणी, कामगार महिलावर्ग श्रमाची कामे करणाऱ्या महिला यांचे प्रमाण अधिक वाढले आहे. 

हिमोग्लोबिन कमी होण्याची लक्षणे 
धाप लागणे, धडधड वाढणे, श्‍वास घ्यायला त्रास होणे, अशक्तपणा येणे, शरीराच्या अवयवांचे दुखणे, कामात मन न लागणे, काम करण्याची इच्छा न होणे 
 
प्रतिक्रिया 

महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. नियमित व पोष्टिक आहार घेणे यादृष्टीने लक्ष देणे काळाजी गरज आहे. विशेषतः त्या महिला ज्यांना अतिश्रमाची कामे करावी लागतात. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्‍यक आहे. -डॉ. निवेदिता पवार, स्त्रीरोग तज्ज्ञ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT