sunrise beauty attraction To create life magic Sakal
फॅमिली डॉक्टर

आश्‍वस्त करणारे तेच सौंदर्य!

दिवसाच्या पहिल्या क्षणी म्हणजे सूर्योदयाच्या क्षणी संपूर्ण आकाशभर पसरलेला सोनेरी, लालसर, गुलाबी रंग आणि रसरसता लाल रंगाचा गोळा पाहिल्यानंतर जीवनाचे आकर्षण

सकाळ वृत्तसेवा

सर्व प्राणिमात्रांना विश्र्वात व जीवनात धरून ठेवण्याचे आकर्षण फक्त सौंदर्यात असते. दिवसाच्या पहिल्या क्षणी म्हणजे सूर्योदयाच्या क्षणी संपूर्ण आकाशभर पसरलेला सोनेरी, लालसर, गुलाबी रंग आणि रसरसता लाल रंगाचा गोळा पाहिल्यानंतर जीवनाचे आकर्षण कोणाला वाटणार नाही?

सूर्याचे कर्तृत्व, सूर्याची उष्णता, सूर्याने जीवनाला दिलेली ऊब आणि सूर्याने जीवननिर्मितीसाठी दिलेली शक्ती याची कशाचीच तुलना होऊ शकत नाही. असा हा सूर्य सकाळच्या वेळी त्याच्या उषा सहचरीबरोबर ज्यावेळी प्रकट होतो त्यावेळचे सौंदर्य एवढे अवर्णनीय असते की थंड हवेच्या ठिकाणी हिल स्टेशनवर गेलेली मंडळी दिवसभर थकून भागून झोपल्यानंतर सकाळी साखरझोपेतून उठू नये असे वाटत असतानाही भल्या पहाटे उठून सूर्योदय पाहायला जातात.

त्यामागे ओढ असते सौंदर्याचीच. बऱ्याच वेळा असे म्हटले जाते की, सर्व मोठ्या लढाया या स्त्रीमुळे होतात. परंतु खरं पाहता लढाई ही स्त्रीसाठी नसून सौंदर्यासाठी असते. परंतु सौंदर्य हा अनुभवण्याचा विषय आहे. सौंदर्यावर ताबा मिळवायचा, त्यावर स्वतःची मालकी प्रस्थापित करायची ही कल्पना नसावी.

सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या मनात, डोळ्यांत, बुद्धीत व मेंदूत असते असे म्हणायला हरकत नाही, त्यामुळे सौंदर्याची एक ठरावीक व्याख्या करता येईल असे दिसत नाही. एखाद्याला न आवडलेली वस्तू दुसऱ्याला मनापासून आवडते. दुकानात नेऊन पत्नीला एखादी साडी दाखवावी तर तिला ती साडी अजिबात पसंत पडत नाही.

त्याऐवजी तिला पलीकडच्या काउंटरवर स्त्रिया साड्या पाहत असतात त्यापैकी एक साडी आवडते. सांगायचा हेतू काय तर सौंदर्य सर्व चराचरांत असले तरी ते व्यक्तिगत असते. सौंदर्याची देवाशी असलेली जवळीक यातच दडलेली आहे, कारण देव जसा एकमेवाद्वितीय असतो तसे सौंदर्यही एकमेवाद्वितीय असते.

म्हणूनच सौंदर्याची मोजमापे ठरविता येत नाहीत. तरीही एकूण पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर, स्पर्शानंतर मनात कुठल्याही प्रकारची विकृती निर्माण झाली नाही तर ते खरे सौंदर्य असे म्हणायचे.

आदि शंकराचार्यांच्या अन्नपूर्णास्तोत्रात ‘नित्यानन्दकरी वराभयकरी सौंदर्यरत्नाकरी’ असा उल्लेख आहे. त्यावरून एक गोष्ट लक्षात येते की सौंदर्याचे मोजमाप हे आनंद देणारे आणि अत्यंत आश्र्वस्त असा विश्र्वास उत्पन्न करणारे तत्त्व आहे.

शरीरसौष्ठव हा सौंदर्यातला एक महत्त्वाचा भाग. पुरुषाच्या सौंदर्याचे वर्णन करताना साधारणतः सिक्स पॅकची वर्णने सापडतात. तथापि त्याचबरोबर व्यक्तीचा दिलदारपणा, शौर्य, सज्जनता आणि त्याने दिलेला मदतीचा हात याला अधिक महत्त्व दिलेले दिसते.

स्त्रीच्या बाबतीत नितंब, स्तन, घाटदार मांड्या-पाय, सुबक निमुळते हात असे सौंदर्याचे वर्णन केलेले सापडले तरी स्त्रीच्या डोळ्यात असलेला प्रेमभाव व तिच्या डोळ्यांनी टाकलेल्या कटाक्षांतून मिळालेला प्रेमसंकेत हाच तिच्या सौंदर्याकडे पाहण्यासाठी दिलेला परवाना असतो. कारण नसताना परक्या स्त्रीकडे पाहून तिचे सौंदर्य निरखणे हे असभ्यतेचे लक्षण समजले जाते. त्याचबरोबर स्त्री कितीही सौंदर्यवती असली तरी तिची शालीनता, घरंदाजपणा, लाजलज्जा, शिक्षण, कलानिपुणता या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.

शरीराचे सौष्ठव वाढविण्यासाठी बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. रस-मांसधातू व त्वचा पुष्ट राहील, हाडांमध्ये जोर येऊन हाडे मजबूत राहतील व शरीरात भरपूर रक्त खेळते राहिल्यामुळे शरीर तेजःपुंज दिसेल या दृष्टीने आयुर्वेदाने आहारयोजना सुचविलेली दिसते.

कचरापेटी कितीही रंगीबेरंगी व आकर्षक असली तरी तिच्यात बरेच दिवसाचा कचरा साठल्याने व सडल्याने असह्य दुर्गंधी येत असल्यास त्या कचरापेटीच्या आसपास कोणी फिरकत नाही, ती साफ करून घेणे आवश्‍यक असते.

तसेच सौंदर्याची उपासना करणाऱ्यांनी सौंदर्य वाढविण्यासाठी प्रथम पंचकर्मातील वमन, विरेचन, बस्तीद्वारे शरीर साफ करून घेणे आवश्‍यक असते. सांध्यांचा लवचिकपणा, हाडांची मजबुती, वातविकारांपासून मुक्तता या गोष्टी बस्तीमुळे साधतात.

बस्तीसाठी वापरण्यात आलेले काढे वा तेल विशिष्ट औषधांपासून बनविलेले असले तर वर्ण उजळून व्यक्ती तेजःपुंज दिसू लागते. दूध, साय, दही, लोणी, तूप या सर्वांचा आहारात समावेश करण्याने तारुण्य, पर्यायाने सौंदर्य वाढण्यास मदत मिळते. वरून लावण्यासाठीही सायीचा उपयोग करता येतो. न्हाण्यापूर्वी केसांना लिंबू चोळून कोरफडीचा रस लावल्यास केसांची निगा राखली जाते. सकाळी चेहऱ्यावर थोडी साय लावल्याने

सौंदर्यात भर पडते. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी त्यात हिरडा टाकून घेतल्यास त्वचेचे व डोळ्यांचे तेज वाढायला मदत होते, केस दाट व गडद रंगाचे होतात. घरच्या घरी अशा छोट्या व सोप्या गोष्टींचे पालन केल्यास सौंदर्य वाढवता येऊ शकते.

शरीराच्या सौंदर्यासाठी तसेच तारुण्यासाठी शुद्ध हवेत चालणे, योगासने, व्यायाम, प्राणायाम यांचा अभ्यास नियमितपणे करणे यांची आवश्‍यकता असते. शरीराचे सौष्ठव वाढविण्यासाठी वातूळ पदार्थांचा अतिरेक टाळावा.

शरीरात कुठेही चरबीचा साठा होत आहे, असे आढळल्यास औषधी वनस्पतींनी संस्कारित केलेल्या अभ्यंग तेलाने मसाज करण्यास सुरुवात करावी, अपचन होणार नाही याकडे लक्ष ठेवावे.

तारुण्य टिकविण्याच्या दृष्टीने ऋतुचर्येनुसार आहार-विहार यावर खूप लक्ष ठेवणे गरजेचे असते. स्त्रियांच्या बाबतीत विशिष्ट व्यायाम केल्यास खांदे, मांड्या यांना चांगला आकार येऊ शकतो. स्तन व्यवस्थित राहण्याच्या दृष्टीने आयुर्वेदाने स्तनांवर मसाज करण्यासाठी काही औषधे व तेले सुचविलेली आहेत.

बाळंतपणानंतर वात वाढू नये यासाठी आयुर्वेदाने बऱ्याच गोष्टी सुचविलेल्या आहेत. पोटावर स्ट्रेच मार्क्स येऊ नयेत या हेतूने गर्भारपणापासून तेल लावणे महत्त्वाचे ठरते. अंगावरून पांढरे, लाल जाऊ नये, कुठल्याही प्रकारचा स्त्रीरोग होणार नाही यावर लक्ष ठेवणे आवश्‍यक असते. काही त्रास होत असल्यास लगेच आयुर्वेदाच्या तज्ज्ञांना भेटून मार्गदर्शन व औषध घेणे इष्ट ठरते. पुरुषांच्या बाबतीतही वीर्यस्खलनाचा अतिरेक तारुण्यासाठी बाधक ठरू शकतो.

जगात सौंदर्य आहे म्हणून प्रेरणा असते, उत्साह असतो, त्यामुळे सौंदर्य हे हवेच आणि यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्‍यक होय.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT