Traditional Maharashtrian coconut sweet recipe for Narali Purnima sakal
फूड

Narali Purnima Special Recipe: यंदा नारळी पौर्णिमेला बनवा खास सातपदरी साखर-खोबऱ्याची पोळी, लगेच नोट करा 'ही' सोपी रेसिपी

Traditional Maharashtrian coconut sweet recipe for Narali Purnima: नारळी पौर्णिमेच्या गोड सणासाठी खास अशी पारंपरिक सात थरांची साखर-खोबरे पोळी जरूर करून पाहा!

सकाळ वृत्तसेवा

दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या ठिकाणी नारळ पौर्णिमा साजरी केली जाते. कोळी समाजासाठी हा सण अतिशय महत्त्वाचा असतो. पण संपूर्ण महाराष्ट्रात या दिवशी नारळाचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. अशाच पारंपारिक पदार्थांपैकी एक म्हणजे सातपदरी साखर-खोबरं पोळी. ओल्या नारळापासून बनवली जाणारी ही खास पोळी थरावर थर रचत बनवली जाते. नारळी पौर्णिमेच्या दिवशी ही खास रेसिपी बनवल्यास गोडवा अजून वाढेल.

साहित्य

दोन वाट्या मैदा, मीठ, चार टेबलस्पून तुपाचे मोहन, दूध.

सारण

दोन वाट्या खोबरे, एक वाटी साखर, वेलदोडा पूड, थोडे केशर, थोडा केशरी रंग, बदामाची पूड.

कृती

मैदा, मीठ व तूप एकत्र करून दुधाने घट्ट पीठ भिजवावे. साखर, खोबरे एकत्र करून मिनिटभर गॅसवर ठेवून परतावे. लगेच उतरवावे. नंतर त्यात वेलदोडा पूड, केशर, केशरी रंग व बदामाची पूड घालून ढवळावे. सारण केशरी रंगाचे दिसले पाहिजे. सारणाचे सहा भाग करावे. वरील पिठाच्या सात पोळ्या लाटून कागदावर किंवा प्लास्टिकवर पसरून ठेवाव्या.

मंद गॅसवर सपाट तवा ठेवावा. त्यावर एक पोळी ठेवावी. खालच्या बाजूने जरा डाग पडले, की उलटावी. त्यावर सारणाचा एक भाग पसरावा व त्यावर दुसरी पोळी पसरून कडेने दाबावे. नंतर उलथन्याने पोळी उलटावी. कडेने थोडे तूप सोडावे. वरच्या बाजूला सारणाचा एक भाग पसरावा व त्यावर तिसरी पोळी घालून कडेने दाबावे व पोळी उलटावी. थोडे तूप सोडावे. अशा प्रकारे सर्व सात पोळ्या एकमेकांवर घालून केकसारखा मोठा सातपदरी पराठा तयार करावा. हा पराठा थाळीमधे अलगद काढून घ्यावा. सुरीने केकप्रमाणे कापून तुकडे करावे. ओल्या नारळाच्या करंजीप्रमाणे चव लागते.

- सायली पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT