Babinka
Babinka Sakal
फूड

खाद्यभ्रमंती - गोव्याचा बबिंका

आशिष चांदोरकर

हल्ली बाजारात अनेक प्रकारचे केक मिळतात. नेहमीचा केक, चीज केक, फ्रूट केक आणि इतरही काही प्रकारचे केक मिळत असतील. पण केकसदृश असूनही केकच्या वरील सर्व प्रकारांपेक्षा वेगळा असणारा एक प्रकार म्हणजे गोव्याचा बेबिंका. गोव्यात बेबिंकाला बेबिक असंही म्हटलं जातं. बेबिंकाचा समावेश केकच्या प्रकारात करायचा, की पुडिंगच्या प्रकारात करायचा, हा वादाचा विषय असू शकतो. पण बेबिंका हा पदार्थ एकदम जबराट आहे, या बाबत वाद होण्याचं काही कारण नाही.

माझी आणि बेबिंकाची पहिली भेट झाली ती रानडे इन्स्टिट्यूटमध्ये मी पत्रकारितेचा अभ्यासक्रम करीत असताना. आमच्या वर्गातील गोव्याच्या शिल्पा जमखिंडीकरनं बेबिंका आणला आणि हे खाऊन बघा, असा आग्रह आम्हाला केला. खाल्ल्यानंतर मी तर बेबिंकाच्या प्रेमातच पडलो हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यावेळेस पासून जेव्हा जेव्हा बेबिंका खायची संधी मिळते तेव्हा मी सोडत नाही. नंतर जेव्हा जेव्हा मी गोव्यात गेलो तेव्हा बेबिंका खाल्ला.

अगदी अलिकडे माझा मित्र अनिल बरवे गोव्याला गेलेला, तेव्हा तो तिथून खास माझ्यासाठी बेबिंका घेऊन आला. गोव्याची ही आगळीवेगळी स्वीट डिश पुण्यात थेट घरात बसून खायला मिळणं, म्हणजे स्वर्गसुखच. अशा वेळी वाटतं, की आयुष्य सुंदर आहे हो फक्त गोव्यात गेल्यानंतर बेबिंका आणणारे अनिल बरवेसारखे दोस्त पाहिजेत.

बेबिंका पोर्तुगीजांनी गोव्यात आणला असावा, असं म्हणतात. विशेषतः ख्रिसमसच्या काळात बेबिंका आवर्जून केला जातो. पण आता पर्यटकांच्या मागणीमुळं गोव्यात वर्षभर बेबिंका मिळतो. मैदा, नारळाचं दूध, अंडी, खजुराचं सिरप, तूप आणि इतर जिन्नस वापरून हे स्वर्गसुख तयार केलं जातं. दिसायला एखाद्या केकसारखा, पण केकच्या तुलनेत अगदी पातळ नि भरपूर थरांचा. होममेड असेल तर अधिक उत्तम. सात, बारा किंवा सोळा अशा संख्येत बेबिंकामध्ये थर असतात. अर्थात, त्याला तसा काही नियम नाही. प्रत्येकाच्या चवीनुसार आणि आवडीनुसार थर नि जिन्नस बदलले जाऊ शकतात.

दिसायला एखाद्या चॉकलेट केकसारखा असलेला बेबिंका खाताना केकसारखा कापून खातात. कदाचित सोडा किंवा यिस्ट नसल्यामुळं तो केकसारखा हलका होत नाही. पण असतो एकदम नरम. प्रत्येक तुकड्याला साखरेची गोडी, खजुराच्या सिरपची चव आणि हलका तूपकटपणा जाणवत राहतो.

इथून पुढं जर तुम्ही कधी गोव्याला गेल्यास जरूर आस्वाद घ्या किंवा कुणी गोव्यातून कोणी जाणार असल्यास त्यांना नक्की आणायला सांगा... अनेकांना गोवा म्हटलं की फेणी आठवते. पण मला मात्र, गोवा म्हटलं की बेबिंका आठवतो...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Afghanistan Floods : अफगाणिस्तानमध्ये महापूर, ३०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू; अनेक घरं गेली वाहून

PM Narendra Modi : ''पाकिस्तानकडून कुणीही अणुबाँब खरेदी करत नाही'', मोदींचा काँग्रेसला टोला, म्हणाले...

Shirpur Jain News : पार्श्वनाथच्या मंदिरात पुन्हा तुंबळ हाणामारी, दोन जण जखमी

Video: पंतप्रधान मोदींनी रॅलीदरम्यान महिलेचे केले चरण स्पर्श; कोण आहेत 80 वर्षीय पूर्णमासी जानी?

Pune Rain Updates : पुण्यात वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात

SCROLL FOR NEXT