फूड

खाद्यभ्रमंती : पदार्थ यम्मी, किंमत निम्मी

पुण्यात कॅम्पमध्ये गेल्यानंतर अनेक नावाजलेल्या रेस्तराँची, तसेच अनेक इराणी हॉटेल्सची नावं आपल्या डोळ्यांसमोरून तरळून जातात.

आशिष चांदोरकर

पुण्यात कॅम्पमध्ये गेल्यानंतर अनेक नावाजलेल्या रेस्तराँची, तसेच अनेक इराणी हॉटेल्सची नावं आपल्या डोळ्यांसमोरून तरळून जातात. तुम्ही कधी पुण्यात कॅम्पमध्ये गेलात, तर महात्मा गांधी रोडवरील (एमजी रोड) मार्झोरिन बेकरीच्या अलीकडील ‘पुणे झरथोस्ती सेवा मंडळा’मार्फत चालविल्या जाणाऱ्या फूड जॉइंटला आवर्जून भेट द्या. तिथं बसून खाण्याची व्यवस्था नाही. फक्त ‘टेक अवे’ आहे. पण तरीही कॅम्पमध्ये गेल्यानंतर खवय्यांनी तिथं गेलंच पाहिजे, असा हा स्पॉट.

अंडी आणि चिकन यांचे भरपूर खाद्यपदार्थ इथं खायला मिळतात. अवघ्या दहा रुपयांच्या चटणीरोलपासून चिकन बिर्याणीपर्यंत. सर्व पदार्थांचे दर अत्यंत माफक. आणि माफक दर असूनही पदार्थ एकापेक्षा एक स्वादिष्ट. चिकन सामोसे, रोल्स, बर्गर, पॅटिस, कटलेट्स, कबाब आणि असंख्य वेगवेगळ्या पदार्थांची इथे रेलचेल असते. बटर चिकन पॅटिस, चिकन बार्बेक्यू, चिकन खिमा पॅटिस, क्रिस्पी चिकन कटलेट, चिकन रेश्मी, चिकन टिक्का काठी कबाब, चिकन कटलेट, स्पायसी चिकन, चिकन टिक्का रोल, चिकन सबमरीन रोल आणि चिकन क्रिमी रोल अशा वैविध्यपूर्ण पदार्थांची मेजवानी खवय्यांना मिळते.

व्हेज खवय्यांसाठी चटणी रोल, कॉर्न पालक चीज कबाब, व्हेज चिली रोल, पनीर भुर्जी रोल, चीज पनीर रोल, व्हेज मशरूम क्विशे, व्हेज चीज बर्गर, चीज पनीर पॅटिस आणि अनेक वेगवेगळ्या शाकाहारी पदार्थांची रेलचेल तिथं पहायला मिळते. एग चटणी पॅटिस आणि अंड्याचेही इतर काही पदार्थ उत्तम चवीचे मिळतात. सर्व पदार्थ एकदम फ्रेश आणि गरमागरम. सर्व पदार्थ ताजे असतातच. ते देताना ओव्हनमध्ये गरम करून देतात. त्यामुळे पदार्थांची चव अधिकच चांगली लागते.

‘पुणे झरथोस्ती सेवा मंडळा’मार्फत चालविल्या जाणाऱ्या या फूड जॉइंटचं आणखी एक वैशिष्ट्य असं, की इथं रात्री पावणेनऊनंतर बहुतांश पदार्थ एकावर एक मोफत दिले जातात. चिकन बिर्याणी वगैरे सोडून. तर दुपारी दीड ते साडेचार या कालावधीत रोल्स आणि बर्गरवर ५० टक्के सवलतही देण्यात येते. जॉइंट बंद करताना पदार्थ उरू नयेत आणि टाकण्याची वेळ येऊ नये, यासाठी कदाचित ही सवलत देण्यात येत असावी.

पदार्थ वाया जाण्यापेक्षा ते लोकांना सवलतीत देण्याची ही संकल्पना फक्त पारशी समाजच राबवू शकतो. ‘खाऊन माजा, पण टाकून माजू नका...’ या गोष्टीची प्रत्यक्ष आणि एकदम उत्तम अंमलबजावणी. व्यवसाय, फायदा, नफानुकसान यांचा फार विचार न करता अगदी प्रभावी कृती.

अर्थात, इथं मिळणारे पदार्थ इतके स्वादिष्ट आहेत, की या भागात कधीही गेलात तरी नक्की भेट द्या. काही चतुर पुणेकर दुपारी दीड आणि रात्री पावणेनऊची वाट पाहत असतात. पदार्थ इतके दर्जेदार आहेत, की दुपारचा दीड वाजण्याची किंवा रात्रीचे पावणेनऊ वाजण्याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. कॅम्पात कधीही गेलात, तर एकदा तरी भेट द्यावी, असाच हा फूड जॉइंट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT