Actress Trishla Shah esakal
फूड

अभिनेत्री त्रिशला शहा: मॅप्रोच्या पिझ्झाची चव अजूनही तीच

सकाऴ वृत्तसेवा

खूप वर्षांपासून मॅप्रोचा पिझ्झा खाते, पण अजूनही त्याची चव तीच आहे.

महाबळेश्वर हे माझे आवडते पर्यटनस्थळ आहे. तिथे असलेले मॅप्रो गार्डन्स तर बऱ्याच जणांच्या परिचयाचे असावे. पुण्याहून अगदी चार तासाच्या अंतरावर असल्यामुळे तिथे बऱ्याचदा जाणे होते. दोन दिवस तेथे हॉटेलमध्ये राहून माघारी येताना तेथील पिझ्झा आणि त्यासोबत स्ट्रॉबेरी विथ क्रीम खायला आवर्जून तिथे थांबतो. खूप वर्षांपासून मॅप्रोचा पिझ्झा खाते, पण अजूनही त्याची चव तीच आहे.

अलीकडेच लॉकडाऊनमध्ये मी बेकिंग शिकले. बेकरीच्या पदार्थांबरोबर आता मला पिझ्झा बेसही बनवता येतो. त्यात हवे ते पदार्थ वापरून मस्त पिझ्झा बनवून घरच्यांना खायला घालते. माझे आई आणि वडील मी बनविलेला पिझ्झा अगदी आवडीने खातात. माझा लहान भाऊ ईशान तर लगेच त्याच्या मित्रांनाही पिझ्झा पार्टीसाठी बोलावून घेतो. कामाच्या व्यापातून हल्ली महाबळेश्वरला जाणे फारसे होत नाही, याची खंत आहे. पण, मॅप्रोच्या पिझ्झाची ती चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे. पावसात भिजत महाबळेश्वरमधील आठवणींना उराशी कवटाळून तो पिझ्झा खाणे आणि त्याची मज्जाच काही वेगळी आहे.

शब्दांकन : अरुण सुर्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातने केली सोलापुरात जमिनीची खरेदी; अतिरिक्त मोबदल्यासाठी लावली आंब्याची झाडे, भूसंपादन प्रक्रियेत घोटाळे?

Breaking News Live Update: नाशिकमधील अत्याचार प्रकरणानंतर नामांकित आयटी कंपनीचे युनिट बंद होणार

Harshvardhan Sapkal: राष्ट्रवादी काँग्रेसला आमचा विरोध कायम: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, गुन्हा नोंदविण्याबाबत राष्ट्रवादीचेही मौन!

IPL 2026: पराभवाची हॅट्‌ट्रिक टाळण्याचे मुंबईसमोर आव्हान; वानखेडेवर आज रॉयल चॅलेजर्स बंगळूरशी सामना, कशी असेल प्लेइंग-११

फिनालेपूर्वी 'हा' सदस्य घराबाहेर! बिग बॉसच्या पर्वातलं धक्कादायक Eviction, कोण आहे ती व्यक्ती?

SCROLL FOR NEXT