Adhik Maas 2023 esakal
फूड

Adhik Maas 2023 : जावयांना लागले धोंड्याच्या वाणाचे वेध ! सोशल मीडियाने वाढवली अधिक मासातल्या पदार्थांची क्रेझ

काहीं कुटुंब तर या लक्ष्मी-नारायणाच्या जोडीला थेट रेस्टॉरेंटमध्येच बोलावून सेलिब्रेशन करीत आहेत. बाजारात खास रेडिमेड ‘धोंडे’, तेही आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध आहेत.

साक्षी राऊत

Adhik Maas 2023 : अधिक मास सुरू झाला असून जावयाला सासरी बोलावून त्यांचे आदरातिथ्य करण्याचे वेध लागले आहे. बाजारातही धोंड्याच्या वाणासाठी खास अनारसे व इतरही मिष्ठांन्न तयार स्वरूपात उपलब्ध आहे. शहरातील विविध दुकानात धोंडफळ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. काही कुटुंब यानिमित्त खास हॉटेलमध्येही सेलिब्रेशनचा बेत आखत आहेत.

अधिक मासात मुलीला व जावईबापूंना घरी मोठ्या थाटात जेवायला बोलविले जाते. लेक व जावयासाठी खुसखुशीत अनारसे, पुरण घालून तयार केलेले धोंडे हौसेने तयार करणात येतात. मात्र, अनेक कुटुंबात हे पदार्थ घरी करण्यास वेळ मिळत नाही.

अशा कुटुंबांसाठी किंवा ज्यांना अनारसे, धोंडे व्यवस्थित करता येत नाहीत, अशांसाठी रेडिमेडचा आधार आहे. काहीं कुटुंब तर या लक्ष्मी-नारायणाच्या जोडीला थेट रेस्टॉरेंटमध्येच बोलावून सेलिब्रेशन करीत आहेत. बाजारात खास रेडिमेड ‘धोंडे’, तेही आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध आहेत.

सोशल मीडियाने क्रेझ वाढली

मध्यम वर्गातील नागरिक चांदी, पितळीच्या भांड्यांचे वाण जावयांना देतात. तांबे आणि स्टीलचीही भांडी दिली जात असून त्यांची मागणी वाढली आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच अधिक मासात सासरी जात असलेले जावई जास्ती उत्सुक असल्याचे दिसते. जावयाला सोन्याची अंगठी वा चैन दिली जाते. त्यामुळे सध्या सराफाच्या दुकानातही गर्दी दिसून येत आहे.

रेडिमेड ३३ धोंडे २८० रुपयात विकले जात आहेत. आकर्षक पॅकिंग स्वरूपात ते उपलब्ध आहेत. पारंपरिक पद्धतीचे धोंडे पुरण घातलेले असतात. मात्र ते दोनच दिवसांत खावे लागतात. त्यामुळे इतर मिठाईंचे धोंडेही बाजारात उपलब्ध आहेत. (Sanskruti)

शहरात अधिकमासाच्या निमित्ताने जावयाला घरी बोलवून धोंडे दिल्यानंतर हॉटेलमध्ये जेवणावळी केल्या जात आहेत. आमच्याकडे अनेक परिवार येत असून त्यांच्याकडून फक्त शाकाहारी भोजनाची मागणी होत आहे. (Adhik Maas)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT