Adhik Shravan Maas  esakal
फूड

Adhik Shravan Maas : श्रावण सोमवारचा उपवास सोडण्यासाठीची खास स्वीट डिश, लगेच नोट करा रेसिपी

ही स्वीट डिश सर्वत्र प्रसिद्ध असून बऱ्याच लोकांची ती आवडतीसुद्धा आहे.

साक्षी राऊत

Adhik Shravan Maas : हिंदू कॅलेंडरमध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे. या महिन्यात भोलेनाथांची मनोभावे पूजा केली जाते. बरेच लोक श्रावणी सोमवारचे व्रतही ठेवतात. हे व्रत सोडताना तुम्ही ही स्पेशल रेसिपी ट्राय करू शकता. या रेसिपीचे नाव आहे मालपुआ. ही स्वीट डिश सर्वत्र प्रसिद्ध असून बऱ्याच लोकांची ती आवडतीसुद्धा आहे.

मालपुआ डिशसाठी लागणारे साहित्य

२ कप गव्हाचे पीठ, वेलदोड्याचा थोडा कुट, किसलेले खोबरे, २५० ग्रॅम साखर, अर्धी लीटर दूध

मालपुआ बनवण्यासाठी लागणारे साहित्य

१. मालपुआ बनवण्यासाठी सगळ्यात आधी दूधात साखर टाकून जवळपास अर्धा तास गॅसवर ठेवा.

२. नंतर गव्हाच्या पिठात नारळाचा किस आणि वेलदोड्याचा कुट टाकून चांगल्याप्रकारे मिसळून घ्या.

३. आता यात दूध मिसळून घट्ट पेस्ट तयार करून घ्या.

४. आता एका कढईत तूप गरम करा आत एक मोठा चमचा तूप या घट्ट पेस्टमध्ये घाला.

५. आता पुआ दोन्ही बाजूंनी चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्या. तुमचा टेस्टी मालपुआ खाण्यासाठी तयार आहे.

तुम्ही श्रावणी सोमवारचा उपवास सोडण्यासाठी आणखी एक डिश ट्राय करू शकता. ती म्हणजे सोहन हलवा. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

सोहन हलव्यासाठी लागणारे साहित्य

सोहन हलवा बनवण्यासाठी तुम्हाला

मैदा - 1/2 किलो साखर

1/2 किलो

बदाम - 1/4 किलो

तूप - 1/2 किलो

दूध - 1 कप

पिस्ता - 100 ग्रॅम

बेदाणे - 5-6

काजू - 5-7

हिरवी वेलची - 5-7 (Food)

सोहन हलवा बनवण्याची पद्धत

1. सोहन हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या पातेल्यात एक लिटर पाणी गरम करा. आता त्यात साखर घाला.

2. नंतर त्यात एक कप दूध घाला. ५ मिनिटे शिजू द्या.

3. आता गरम झालेले द्रव कपड्याने गाळून घ्या. नंतर उरलेले पाणी आणि साखरेचा पाक मिक्स करा. (Recipe)

४. यानंतर मैदा घ्या आणि पाण्यात घोळून त्याला मंद आचेवर शिजवा. आता पीठ घट्ट होऊ लागले की त्यात एक मोठा चमचा तूप घाला. सतत ढवळत राहा म्हणजे ते चिकटणार नाही.

5. काही वेळाने हे तुपाचे मिश्रण वेगळे दिसू लागेल. यावरून समजून घ्या हे मिश्रण शिजून रेडी झाले आहे.

6. आता त्यात ड्राय फ्रुट्स म्हणजे बदाम, पिस्ता आणि हिरवी वेलची घाला. आता तूप लावल्यानंतर हे मिश्रण ट्रे किंवा प्लेटमध्ये काढून पुडिंगसारखे पसरवा.

7. बदाम, पिस्ता, काजूने सजवा. नंतर थंड झाल्यावर त्याचे तुकडे करा. आता ते सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. तुमची स्वीट डिश तुम्ही कधीही खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT