Chinese Fastfood Sakal
फूड

सावधान! चायनीज खाताय? होऊ शकतात हे गंभीर आजार

जिभेचे चोचले पुरवणाऱ्या अनेक चायनीज पदार्थांमध्ये अजिनोमोटोचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

सकाळ वृत्तसेवा

Harmful Effects of Ajinomoto : कोरोनाचा वेग मंदावला असून आता दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. त्यामुळे फास्टफूडच्या स्टॉल्सवर खवय्यांची गर्दी होताना दिसत आहे. जिभेचे चोचले पुरवणाऱ्या अनेक चायनीज पदार्थांमध्ये अजिनोमोटोचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो; मात्र अजिनोमोटो असलेल्या पदार्थांच्या अतिसेवनामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचा निष्कर्ष वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

शहरातील चायनीज सेंटर तसेच हातगाड्यांवरील खाद्यपदार्थांच्या दुकानांवर खवय्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे; मात्र चटपटीत चायनीज खाद्यपदार्थांमुळे काही वर्षांनी आरोग्यावर (Health) परिणाम होत असल्याचे समोर येत आहे.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार हल्ली तरुणांमध्ये डोकेदुखी, अर्धशिशी, छातीत धडधड वाढणे, उलट्या, तसेच धाप लागणे अशा आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामागील प्रमुख कारणांमध्ये फास्ट फूडचे अतिसेवन हेदेखील आहे.

पोटविकारतज्ज्ञ डॉ. दर्शील शहा म्हणाले, ‘चायनीज खाद्यपदार्थांमध्ये चटपटीतपणा तसेच चव येण्यासाठी अजिनोमोटोचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, परंतु जिभेचे चोचले पुरवणारी ही क्लृप्ती आरोग्यावर परिणाम करते. अजिनोमोटो असलेल्या पदार्थांच्या अतिवापरामुळे मायग्रेन, चक्कर येणे, हार्मोन्सचे संतुलन बिघडणे, जीव घाबरा होणे, अशक्तपणा, छातीत दुखणे आदी तक्रारी उद्‍भवतात. तसेच काही लोकांना अतितणाव, नैराश्य, थकवा जाणवणे अशा तक्रारी दिसत आहे.

''कोणत्याही पदार्थाचा अतिवापर हा आरोग्यासाठी घातकच असतो. अजिनोमोटोमुळे जिभेमध्ये असलेल्या संवेदना इतक्या प्रभावित करतात, की ते पदार्थ वारंवार खाण्याचे व्यसन जडते. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते,'' असे हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अविनाश गुठे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील केमिकल कारखान्यात भीषण स्फोट; २ किमी परिसर हादरला

कमळीचे रिअर लाईफ वडिल पाहिलेत का? लेक दिसते सेम टू सेम आई सारखी, वडिलांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम एकत्र पोहचलं कुटुंब

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT