Akshaya Tritiya 2024 esakal
फूड

Akshaya Tritiya 2024 : अक्षय तृतीयेच्या निमित्ताने घरच्या घरी बनवा केशर आम्रखंड, वाचा सोपी रेसिपी

Akshaya Tritiya 2024 : अक्षय तृतीयेच्या निमित्ताने घरच्या घरी केशर आम्रखंड कसे बनवायचे? जाणून घ्या.

Monika Lonkar –Kumbhar

Akshaya Tritiya 2024 : आज सर्वत्र अक्षय तृतीयेचा उत्साह पहायला मिळत आहे. अक्षय तृतीयेचा दिवस हा वर्षातील सर्वात शुभ दिन मानला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस हिंदू धर्मात अतिशय महत्वाचा मानला जातो. आजच्या दिवशी शुभ कार्यांना सुरूवात केली जाते. सोने-चांदीची खरेदी करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो.

अक्षय तृतीयेला आवर्जून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची खास पूजा केली जाते. गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. आजच्या दिवशी दुधापासून बनवलेले खाद्यपदार्थ देवाला अर्पण केले जातात. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला केशर आम्रखंडाची रेसिपी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात केशर आम्रखंडाची सोपी रेसिपी.

केशर आम्रखंड बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • दही – १ किलो

  • वेलची पूड – १ चमचा

  • जायफळ पावडर – अर्धा चमचा

  • केशर – १ चिमूटभर

  • पिठी साखर – २५० ग्रॅम

  • आंब्याचा रस – १ कप

  • बदाम, काजू, पिस्त्याचे बारीक काप

केशर आम्रखंड बनवण्याची सोपी पद्धत

  • सर्वात आधी दही रात्रभर एका मलमलच्या कापडात लटकवून ठेवा. जेणेकरून त्यातील पाणी काढून टाकता येईल.

  • आता दही फ्रीजमध्ये ठेवा, जेव्हा ते घट्ट होईल आणि जेव्हा ते दही चीजसारखे होईल तेव्हा ते चाळणीतून गाळून घ्या.

  • या घट्ट दह्यामध्ये वेलची पूड, जायफळ पावडर अन् केशर मिसळा.

  • तुम्ही केशरचे धागे अर्धा कप कोमट पाण्यात किंवा दुधात भिजवून ठेवू शकता. यामुळे, केशरचा रंग दुधात चांगला मिक्स होईल.

  • आता दह्यामध्ये पिठीसाखर घालून २-३ मिनिटे चांगले फेटून घ्या, यामुळे दही मऊ होईल.

  • यात साखर पूर्णपणे विरघळली की त्यात आंब्याचा रस घाला.

  • आता या मिश्रणात बारीक चिरलेला पिस्ता, बदाम घालून मिसळा, तुमचे केशर आम्रखंड तयार आहे.

  • आता हे केशर आम्रखंड काही वेळ फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा. त्यानंतर, सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

Marathi News Live Updates : पुढील २४ तास विदर्भात पावसाची शक्यता,३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT