yeti and the monk
yeti and the monk 
फूड

फूडहंट : येती अँड द माँक आगळेवेगळे एशियन फूड

नेहा मुळे

आशियाई फूड म्हटलं की, लगेच मुख्यतः चायनीजच डोळ्यासमोर येतं. मात्र, अजून असे अनेक आशियाई कुझिन्स आहेत जे आपल्याला माहीतही नाहीत. लोकांना नवीन खाद्यप्रकाराचा परिचय व्हावा या उद्देशाने प्रसाद, बिकी आणि सौरभ या हॉटेल मॅनेजमेंट केलेल्या तीन मित्रांनी सुरू केलेला उपक्रम म्हणजे ‘येती अँड द माँक’. नवीन चवींचा परिचय, सवय करून देणे,. हे त्यांचे उद्दिष्ट होते. यासाठीच ‘येती अँड द माँक’मध्ये वेगळ्या आशियाई चवी, म्हणजेच तिबेट, व्हिएतनाम आणि भूतानच्या कुझीन्समधील काही प्रख्यात डिशेस चाखायला मिळतात.

खडकीच्या आंबेडकर चौकाजवळ असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये शिरताच त्याचे वेगळेपण जाणवते. इथे पादत्राणे बाहेर काढून ठेवणे अनिवार्य आहे आणि यामुळेच या रेस्टॉरंटचे हायजिन स्टँडर्ड लक्षात येते. आत गेल्यावर मंद पहाडी संगीत कानावर पडते आणि एका रम्य वातावरणात आपला प्रवेश होतो. या वातावरणात आपण येथे सर्व्ह केल्या जाणाऱ्या गरमागरम वाफाळलेल्या डिशेस अधिकच एन्जॉय करतो.

सध्या पुण्यामध्ये मोमोजची क्रेझ दिसून येते. त्याचे इतके फ्युजन प्रकार मिळायला लागले आहेत, की अस्सल तिबेटी मोमोची चव हरवूनच गेली आहे. येथे मात्र अस्सल तिबेटी चव, अतिशय पातळ आवरण आणि भरपूर सारण असलेले डम्पलिंग्स, म्हणजेच मोमोज नक्की ट्राय करा. व्हेज, चिकन, पोर्क आणि त्यासोबतच वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये डम्पलिंग्स उपलब्ध आहेत. याच्यासोबत मिळणाऱ्या चटणीची चव विलक्षण आहे. शबाले ही आणखी एक प्रसिद्ध तिबेटी ‘फ्राइड मीट पाय’ डिश इथे सर्व्ह केली जाते.

‘बाउल फूड’ किंवा ‘मील इन अ बाउल’ या संकल्पनेवर ‘येती अँड द माँक’चा मेन कोर्स डिझाईन केलेला दिसतो. एक संपूर्ण जेवण या बाउल्सचे उद्दिष्ट आहे. काही उल्लेखनीय बाउल मिल्स म्हणजे ‘फ’ किंवा pho, थुक्पा आणि एमा दात्शी. व्हिएतनामीज ‘फ’ म्हणजे एक टेस्टी सूप डिश. या डिशमधील चवदार ब्रॉथ बनवायला तब्बल ५-६ तास लागतात. भाज्या आणि मीटचा फ्लेवर यामध्ये उतरलेले जाणवतात. यामध्ये फ्लॅट राईस नूडल्स, भाज्या आणि चिकनचा समावेश आहे. थुक्पासारखी ऑथेंटिक तिबेटी स्टेपल फूड डिशची चव उल्लेखनीय आहे. मूळ सौम्य तिखट असलेली ही डिश भारतीय चवीनुसार थोडी स्पायसी केलेली आहे. थुक्पाचे प्रेझेंटेशन आकर्षक आहे. थुक्पाच्या पहिल्या घोटताच प्रेमात पडला नाहीत, तरच नवल. नुकतेच भूतानला जाऊन आले आहेत त्यांनी एमा दात्शी ही डिश नक्कीच ट्राय केली असेल. पुण्यात येऊन भूतानी एमा दात्शी कुठे मिळेल, हा प्रश्‍न पडला असल्यास काळजी नको. एमा म्हणजे मिरची आणि दात्शी म्हणजे चीज. भूतानच्या या राष्ट्रीय डिशची चव नक्की घ्या. इथली फ्रेश डिश म्हणजे व्हिएतनामी समर रोल्स. ताज्या कच्या भाज्यांचा रोलचा क्रंच एक वेगळीच मजा देतो.  

एवढे सगळे खाल्ल्यावर ते पचवायला खास व्हिएतनामी कॉफीची मदत होते. ही कॉफी नेहमीपेक्षा जरा कडू असते. यामध्ये कंडेन्सड मिल्क वापरले जाते. ग्लासमध्ये रंगांच्या विविध छटा आणि थरांमुळे ही कॉफी अतिशय आकर्षक दिसते. कॉफी प्रेमींसाठी तर पर्वणीच. चहा प्रेमींसाठी ‘आर्टिसनल टी’ ही चहाची वेगळीच व्हरायटी नुकतीच मेन्यूमध्ये ॲड केली आहे. डेझर्टसमध्ये कोकोनट जेली हा एक वेगळा येथे प्रकार मिळतो. फक्त वीकएण्डला सर्व्ह केले जाणारे पोर्क चॉप्सही स्पेशल डिश आहे. हे मात्र प्री-ऑर्डर केलेले बरे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT