Modak 
फूड

फूडहंट : मोमोज आणि मोदकाचं कनेक्शन

रविराज गायकवाड

मोमोज् आणि मोदक. शब्दांची सुरुवात सारखीच. दोन्ही पदार्थ तयार करण्याची पद्धत सारखीच. फक्त पदार्थांच्या आतलं स्टफिंग मात्र वेगवेगळं. पण दोन्ही पदार्थ अनेक आशिया खंडात अनेक देशांमध्ये आवडीनं खाल्ले जातात.

खाद्य पदार्थांचा प्रवास हा एक रंजक विषय आहे. चहा भारतात इंग्रजांनी आणला, की तो भारतात आधीपासून आला? भारतीय खाद्य संस्कृतीला जिलबीची ओळख मुघलांनी करून दिली, की आणखी कोणी? बिर्याणी नेमकी कुणाची? असे खाद्य पदार्थांविषयीचे अनेक विषय उत्सुकता वाढवणारे आहेत. त्यात मोमोज आणि मोदकाचं कनेक्शन कायमच चर्चेत असतं. ग्लोबलायझेशनंतर भारताला काही नव्या पदार्थांची ओळख झाली. मॅकडोनाल्ड्‍सची रेस्टॉरंट्स भारतात खुली झाली आणि बर्गरची ओळख झाली. पिझ्झाही भारतीयांना त्यानंतरच माहिती झाला. (पिझ्झा आणि पराठा हा विषय पुन्हा कधीतरी लिहू) तसंच मोमोजचं  मोमोज् सध्या सगळ्या मेट्रो सिटीजमध्ये पाहायला मिळतात. ईशान्य भारतातील तरुण-तरुणी शिक्षण-कामाच्या निमित्तानं बाहेर पडली तसं तिथल्या खाद्य पदार्थांची ओळख मेट्रो सिटीजना झाली. अर्थात, ग्लोबलायझेशननंतर विस्तारत गेलेल्या नोकरी-शिक्षणाच्या संधी त्याला कारणीभूत ठरल्या.

मोदकाचा उल्लेख आपल्या पौराणिक कथांमध्ये अर्थात गणपतीचं आवडतं खाद्य म्हणून केला जातो. तर मोमोजचा इतिहास हा चीनच्या उत्तरेपासून सुरू होतो. अर्थात, मोमोज या शब्दाचा उल्लेख कुठं आलाय, यावरून मोमोजचा इतिहास सांगितला जातो. मोमोज् सध्या मंगोलिया, चीन, तिबेट, नेपाळ आणि पुण्यातल्या चौकाचौकांत मिळतात. प्रत्येक देशात त्याला वेगळं नाव आहे. चीनमध्ये शानशी, नेपाळमध्ये मम म्हटलं जातं. चीन, मंगोलियामध्ये मोमोजमध्ये मांस असायचं. पण तिबेटमधून व्हेजिटेरियन मोमोजचा जगभर प्रसार झाला. मोमोज आणि मोदक या दोन्ही पदार्थांचं कनेक्शन काही असेल का? खरं सांगायचं झालं तर या दोन्ही पदार्थांच्या कनेक्शनचे पुरावे मिळत नाही. पण खवय्यांनी त्याचा विचार कशाला करायचा. स्वस्त आणि मस्त असे मोमोज तुम्ही कधी ट्राय केले नसतील तर नक्की ट्राय करा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT