Ashadhi Ekadashi recipes how to make Upvasachi Kadhi  
फूड

Upvasachi Kadhi Recipe: उपवासाला साबूदाण्यासारखा जड पदार्थ खाण्यापेक्षा हलकी कढी पिणे कधीही चांगलेच, लगेच जाणून घ्या रेसिपी

ही कढी चविष्ट असण्याबरोबरच पचनक्रीया सुधरवते. हे फार सहज, झटपट बनवले जाऊ शकते. उपवासाच्या थालीपीठासोबत हे खाता येऊ शकते.

सकाळ डिजिटल टीम

आज आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशी हिंदू धर्मांमध्ये सर्वात पवित्र आणि महत्वाची मानली जाते. या दिवशी विठुरायाची आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी घरातले जवळपास सगळेच जण उपवास करतात. त्यामुळे गृहिणींचा उत्साह वेगळाच असतो. आनंदाने उपवासाचे वेगवेगळे पदार्थ घरच्या मंडळींना खाऊ घालत असतात.

आता उपवासाला कोणते कोणते पदार्थ करायचे, याची तयारी घरांघरांत सुरू झालेली असणारच त्यासाठी आम्ही तुम्हाला एक अशी रेसिपी सांगणार आहोत जे तुम्ही थालीपीठासोबत खाऊ शकता. तर ती रेसिपी म्हणजे उपवासाची कढी.

ही कढी चविष्ट असण्याबरोबरच पचनक्रीया सुधरवते. हे फार सहज, झटपट बनवले जाऊ शकते. उपवासाच्या थालीपीठासोबत हे खाता येऊ शकते.

साहित्यः

ताजे दही २५० ग्रॅम

सिंगाड्याचे पिठ २५०

खिसलेले आले

लाल मिरची पूड

कोथिंबीर बारीक चिरलेली

तेल

सेंधे मिठ

कृती

एका बाऊलमध्ये एक कप आंबट दही घ्यावे. यात दोन चमचे सिंगाड्याचे पिठ टाकून व्यवस्थित फेटून घ्यावे. वरून दिड कप पाणी घालून एकसारखे करून घ्यावे. त्यानंतर गॅसवर कढईमध्ये तेल किंवा तूप गरम करून एक चमचा जीरे, चिमुटभर सेंधे मिठ, दोन खडी लाल मिरची, अर्धा चमचा खिसलेले आले परतवून त्यात कढीचा घोल टाकावा. याला व्यवस्थित उकळून घ्यावे. १५-२० मिनीटे शिजवले की उपवासाची कढी तयार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT