Avial...kerala's Famous Dish Google
फूड

स्लीम दिसायचंय? मग 'ही' ऐतिहासिक भाजी आहारात नक्की घ्या...

केरळची 'अवियल' ही डीश अनेक भाज्या एकत्रित करून बनवली जाते.

प्रणाली मोरे

भरपूर भाज्यांनी युक्त असा केरळ मधील लोकप्रिय पदार्थ 'अवियल' हा केवळ हेल्दी म्हणून नाही तर एक ऐतिहासिक पदार्थ म्हणून सर्वप्रचलित आहे. या भाजीचा एक इतिहास आहे. चला,तो जाणून घेऊया आधी. महाभारतात पांडवांचा दुसरा भाऊ गदाधारी भीम हा अत्यंत बलाढ्य पण त्याला स्वयंपाकातही रुची होती . पांडवांची सर्व शक्ती ही जणू त्याच्यातच विसावली होती . पांडवांना पराभूत करणे हेच कौरवांचे एकमेव ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी भीमाविरुद्ध कट रचला. त्यांना विविध पक्वानांची लालसा देऊन त्यात विष मिसळले. नंतर बाधित भीमास नदीत ढकलून दिले. भीम थेट नदीच्या खाली असणाऱ्या नाग वासुकी यांच्या नागलोकात जाऊन पोहोचला तेथे त्याला अनेक सर्पांनी दंश केला .

परंतु या दंशांमुळे त्याला झालेली विषबाधा ठीक झाली. वासुकी कुंतीचा नातेवाईक असल्यामुळे नंतर त्याने भीमाचा नागलोकात पाहुणचार घेतला. वासुकीने १०००० सर्पांची शक्ती भीमाला प्रदान केली. भीम ज्यावेळी हस्तिनापुरात (आत्ताचे मेरठ ) परतला तेंव्हा त्याच्या श्राद्धाच्या तयारीसाठी अनेक भाज्या ,भात अशी तयारी करण्यात आली होती . बऱ्याच दिवसांपासून भुकेला असणाऱ्या भीमाने लागलीच त्या सर्व भाज्या एकत्र शिजवल्या त्यात मीठ ,हिरवी मिरची टाकून पटकन एक पदार्थ बनवला तो पदार्थ म्हणजेच हा 'अवियल.'

Avial...kerala's famous dish

अवियलचे महत्त्व :-

यामधून व्हिटॅमिन 'A' मिळते ज्यामुळे दृष्टी चांगली राहते. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स नी भरपूर असा हा 'अवियल' वजन कमी करण्यासाठी आणि कुपोषणावर इलाज करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे . असा हा पौराणिक अवियल नक्की ट्राय करा !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT