Cheela Recipe Sakal
फूड

Cheela Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा पौष्टिक बाजरी मिक्स चीला, जाणून घ्या रेसिपी

Cheela Recipe: तुम्हाला सकाळी नाश्त्यात पौष्टिक बाजरी मिक्स चीला बनवायचा असेल तर पुढील सोप्या पद्धतीने बनवू शकता.

Puja Bonkile

Cheela Recipe: तुम्हाला सकाळी नाश्त्यात काही चवदार आणि पौष्टिक पदार्थ बनवायचे असेल तर बाजरीचा चिला बनूव शकता. हा चिला आरोग्यासाठी फायदेशीर असतो. बाजरीमध्ये अनेक पोषक घटक असतात. जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते. हा चिला बनवणे खुप सोपा असून चवदार देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया बाजरीचा चिला बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची कृती काय आहे.

बाजरी चिला बनवण्यासाठी लागणारे साहित्य

एक कप बाजरीचे पीठ

पाव कप किसलेले गाजर

पाव कप बारीक चिरलेली भोपळी मिरची (विविध रंग)

पाव कप बारीक चिरलेला कांदा

पाव कप बारीक चिरलेला पालक

अर्धा टीस्पून जिरे

अर्धा टीस्पून मिरची पावडर

अर्धा टीस्पून हळद पावडर

अर्धा कप रवा

चवीनुसार मीठ

पाणी

ग्रीसिंगसाठी तेल

बाजरी चिला बनवण्याची कृती

एका भांड्यात बाजरीचे पीठ आणि रवा पाण्यात मिसळून धिरड्यासारखे पीठ भिजवावे. पिठात गुठळ्या राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी. मग पिठात किसलेले गाजर, चिरलेली भोपळी मिरची, कांदे आणि पालक घालावा. चांगले मिसळावे. जिरे, हळद, मिरची पावडर आणि मीठ घालून मिक्स करावे. आपल्या चवीनुसार मसाला घालावा. नॉन-स्टिक पॅन किंवा कढई गरम करावी आणि थोड्या तेलाने ग्रीस करावे. पीठ तव्यावर घालून गोलाकार पसरावे. चीला पातळ घालावा. कडा वर येईपर्यंत आणि तळ सोनेरी तपकिरी होईपर्यंत मध्यम आचेवर शिजवावे. नंतर पलटून दुसरी बाजू शिजवावी. अशा प्रकारे सर्व चीला करून घ्यावेत. बाजरी चीला चटणी किंवा दह्यासोबत गरमागरम सर्व्ह करावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : महापूजेवेळीही भाविकांसाठी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू; पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून 20 किमी अंतरावर, पंढरपुरात 30 लाखांहून अधिक भाविकांचा महापूर

What is The Significance Of Pandharpur Wari? पाऊले चालती पंढरीची वाट...

Pandharpur Ashadhi Ekadashi : "बा विठ्ठला, राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे..."; शासकीय महापूजेनंतर CM फडणवीसांचे पांडुरंगाला साकडे

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : CM देवेंद्र-अमृता फडणवीसांच्या हस्ते विठूरायाची महापूजा; मुख्यमंत्र्यांनी काय मागितलं मागणं?

SCROLL FOR NEXT