Banana Cake Recipe Esakal
फूड

Banana Cake Recipe: बिना मैदा आणि बिना अंड्याशिवाय केक कसा तयार करायचा?

केळीचा केक हा खायला खूप चवदार लागतो आणि आपल्या शरीरासाठी पौष्टिक देखील असतो.

दिपाली सुसर

केळीचा केक हा खायला खूप चवदार लागतो आणि आपल्या शरीरासाठी पौष्टिक देखील असतो. त्यामुळे अशा केकच्या सेवनाने तुमच्या शरीराला खूप फायदा होऊ शकतो. या केकची एक खास गोष्ट म्हणजे हा केक तयार करतांना कुठेही मैदा वापरला जात नाही. म्हणजेच हा केक खाल्यानंतर तुमच्या शरीराला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही

चला तर मग आज आपण पाहू या अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बिना अंडी बिना मैदा केक कसा तयार करता येतो याचीच खास रेसिपी...

साहित्य:

● तिन केळी

● एक कप साखर

● एक कप दही

● एक चमचा व्हॅनिला अर्क

● एक चमचा ऑलिव्ह ऑईल

● दोन कप गव्हाचे पीठ

● एक चमचा बेकिंग पावडर

● एक चमचा बेकिंग सोडा

● दालचिनी पावडर

● टीस्पून मीठ

● चिमूटभर चॉकलेट चिप

कृती:

केळीचा केक बनवण्यासाठी तिन चांगली पिकलेली केळी घ्यावी.नंतर ती केळी सोलुन तिचे छान बारीक बारीक तुकडे करावे. केळीचा केक योग्य बनवण्यासाठी फक्त चांगली पिकलेली केळी घेणे गरजेचे आहे.

यानंतर त्यात एक कप साखर घालावी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी किंवा जास्त करू शकता. आता दोन्ही चांगले एकजीव करा. यानंतर त्यात दही, ऑलिव्ह ऑईल, व्हॅनिला अर्क टाका.यानंतर तुम्ही त्यात तुप किंवा बटर घालावे.

आता पुढे दोन कप गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, दालचिनी पावडर आणि चिमूटभर मीठ घाला. या मिश्रणात गुठळ्या होणार नाहीत याची फक्त काळजी घ्यावी. यानंतर या मिश्रणात चॉकलेट चिप घालावे आणि हलक्या हाताने ते मिश्रण मिक्स करावे. नंतर हे मिश्रण केक ट्रे किंवा ब्रेड मोल्डमध्ये एकसारखे घालचन घ्यावे.

ट्रेमध्ये पीठ ओतल्यानंतर, हवा काढण्यासाठी ट्रे ला एकदा दोनदा थाप द्यावी. यानंतर केकचा ट्रे प्री-हीटेड ओव्हनमध्ये ठेवा. केक 180°C किंवा 356°F वर सुमारे 60 मिनिटे बेक करा.केक शिजला आहे की नाही हे टूथपिकने तपासुन पाहावे, केक शिजल्यावर ओव्हनमधून बाहेर काढा. अशा रितीने तुमचा केळीचा केक तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

Ratnagiri MIDC D Plus Category : रत्नागिरीसाठी ऐतिहासिक निर्णय! एमआयडीसीचा दर्जा थेट 'ड प्लस'; उद्योजकांना मिळणार गडचिरोलीसारख्या बंपर सवलती

Smartwatch Technology: हाताची हालचाल की चालणे? स्मार्टवॉचला कसे कळते तुम्ही किती चाललात? पाहा इनबिल्ट सेन्सर्सचे तंत्रज्ञान...

Latest Marathi News Live Update : मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड समोर; शिंदेंच्या आमदाराची कामगिरी सर्वांत खराब

Katraj-Kondhwa Road Land Acquisition Dispute: कात्रज-कोंढवा रस्त्यावर भूसंपादनाचा पेच कायम; काही मालमत्ता अवॉर्डमध्ये राहिल्याने गोंधळाची स्थिती; पथविभागाला सलग रस्ता करण्यास अडचणी

SCROLL FOR NEXT