Bread Vada Recipe sakal
फूड

Bread Vada Recipe : नाश्त्याला सँडविचऐवजी बनवा 'ब्रेड वडा', सगळ्यांना आवडेल चव, ही आहे रेसिपी

नाश्त्यात थोडासा बदल करायचा असेल तर तुम्ही सँडविचऐवजी ब्रेड वडा करून पाहू शकता.

सकाळ डिजिटल टीम

ब्रेड वडा हा नाश्त्यासाठी एक उत्तम खाद्यपदार्थ असू शकतो. जर तुम्हाला रोज तोच नाश्ता करण्याचा कंटाळा आला असेल आणि यावेळी काहीतरी वेगळे करायचे असेल तर ब्रेड वडा हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

साउथ इंडियन फूड मेदू वडा ऐवजी तुम्ही होममेड ब्रेड वडा ट्राय करू शकता. ब्रेड वडा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. ही एक फूड रेसिपी आहे जी काही मिनिटांत तयार केली जाऊ शकते. सकाळच्या व्यस्त वेळापत्रकात ब्रेकफास्टसाठी ब्रेड वडा सहज तयार करता येतो.

अनेक घरांमध्ये दिवसाची सुरुवात ब्रेडपासून बनवलेल्या सँडविचने होते, पण जर तुम्हाला नाश्त्यात थोडासा बदल करायचा असेल तर तुम्ही सँडविचऐवजी ब्रेड वडा करून पाहू शकता. यामुळे नाश्त्यात बदल तर होईलच पण चवीतही फरक जाणवू शकेल. चला जाणून घेऊया ब्रेड वडा बनवण्याची सोपी पद्धत.

ब्रेड वडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • ब्रेड स्लाइस - 4-5

  • तांदळाचे पीठ - 1/4 कप

  • रवा - 3 चमचे

  • उकडलेले बटाटे – 1

  • दही - 1 कप

  • बारीक चिरलेला कांदा - 1 टेबलस्पून

  • हिरवी मिरची चिरलेली – 2

  • आले पेस्ट - 1/4 टीस्पून

  • कढीपत्ता - 8-10

  • कोथिंबीर - 2-3 चमचे

  • जिरे - 1/2 टीस्पून

  • काळी मिरी - 1/4 टीस्पून

  • जिरे - 1/2 टीस्पून

  • तेल

  • मीठ - चवीनुसार

ब्रेड वडा कसा बनवायचा

ब्रेड वडा बनवण्यासाठी प्रथम ब्रेड स्लाइसचे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या. आता एका भांड्यात बारीक केलेले ब्रेड टाका, त्यात तांदळाचे पीठ आणि ३ टेबलस्पून रवा घालून मिक्स करा. यानंतर, उकडलेले बटाटे सोलून चांगले मॅश करा. बारीक केलेल्या ब्रेडमध्ये मॅश केलेले बटाटे घाला आणि व्यवस्थित मिसळा. यानंतर दही, बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून मिक्स करा.

नंतर मिश्रणात आल्याची पेस्ट, कोथिंबीर आणि कढीपत्ता घालून मिक्स करा. नंतर जिरे, मिरची आणि चवीनुसार मीठ घाला. आवश्यक असल्यास थोडे पाणी घालून मऊ मिश्रण तयार करा. आता हाताला थोडे तेल लावून तयार मिश्रण थोडे थोडे घेऊन वडे बनवा. वडे एका थाळीत बनवून बाजूला ठेवा.

आता कढईत तेल टाकून गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात वडे टाका आणि तळून घ्या. यानंतर एका प्लेटमध्ये ब्रेड वडे काढा. नाश्त्यासाठी चविष्ट ब्रेड वडा तयार आहे. नारळाची चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

Illegal Sand Mining: सुखना नदीतून वाळू उपसा करणारे जेरबंद; पाचजणांवर गुन्हा; पाच ट्रॅक्टरसह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

Manmad News : इंदूर-पुणे महामार्गावर कंटेनर अपघात; मनमाडजवळ वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Updates : मराठा आंदोलक जरांगे पाटील बैठकीसाठी बीडला रवाना

SCROLL FOR NEXT