Breakfast from Soya Chunks esakal
फूड

Breakfast from Soya Chunks : सकाळी प्रोटीनयुक्त अन् चविष्ट असा हेल्दी नाश्ता ट्राय करायचाय? नोट करा ही रेसिपी

आज आपण चवीला टेस्टी आणि हेल्दी अशी सोया चंक्सपासून टिक्की कशी बनवायची याची रेसिपी जाणून घेऊया.

साक्षी राऊत

Breakfast from Soya Chunks : लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला चविष्ट पदार्थ खायला आवडतात. सकाळच्या नाश्त्याता तेच तेच रटाळवाणे पदार्थ असतील तर मुले आणि मोठेही असा नाश्ता खाण्याचा कंटाळा करतात. तेव्हा आज आपण चवीला टेस्टी आणि हेल्दी अशी सोया चंक्सपासून टिक्की कशी बनवायची याची रेसिपी जाणून घेऊया.

सोया पॅनकेक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

1/4 कप सोयाचे तुकडे

२ हिरव्या मिरच्या

2 लसूण पाकळ्या

आल्याचा अर्धा इंच तुकडा

1/4 कप दही

२ चमचे तांदळाचे पीठ

3 चमचे बेसन

2 टीस्पून तीळ

किसलेले गाजर

कोबी चिरलेली

कोथिंबीरीची पाने

कांदा बारीक चिरलेला

2 चिमूटभर पालेभाजी भाजी किंवा कोथिंबीर

चवीनुसार मीठ (Recipe)

सोया पॅनकेक रेसिपी

सर्व प्रथम, सोयाचे तुकडे भिजवून घ्या जेणेकरून ते फुगतील. नंतर मिक्सरच्या भांड्यात सोया चंक्स, दही, हिरवी मिरची, आले, लसूण टाकून चांगले वाटून घ्या. आता एका भांड्यात सर्व बारीक चिरलेल्या आणि किसलेल्या भाज्या घ्या. त्यात सोया चंक्सचे मिश्रण घाला. त्यात बेसन, तांदळाचे पीठ, मीठ, हळद, जिरेपूड, गरम मसाला, कोथिंबीर टाका. सोबत पांढरे तीळ घाला. चांगले मिसळा. आवश्यक असल्यास थोडे पाणी घालून घट्ट पीठ बनवा. (Food)

सोया पॅनकेक रेसिपी

गॅसवर तवा गरम करा. गरम झाल्यावर तेल घालून मिश्रण चमच्याने घेऊन थोडेसे पसरवा. एका तव्यावर दोन ते तीन पॅनकेक बनवता येतात. हे पॅनकेक मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत शिजवा. आणि आता चुमचा पॅनकेक तयार आहे. त्यास हिरवी चटणी किंवा केचप बरोबर गरमागरम सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT