फूड

Breakfast recipe : ब्रेडपासून बनलेला ढोकळाही असतो स्वादिष्ट; पहा कसा बनवायचा

ब्रेड हा सर्वांचाच आवडता पदार्थ

सकाळ वृत्तसेवा

ब्रेड हा सर्वांचाच आवडता पदार्थ आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी तो आठवड्यातून एकदा का होईना खाल्ला जातो. पण, ब्रेडसोबत जाम, बटरच नाश्त्याला दिले जाते. तसेच तो शिल्लक राहिला तर त्याचा उपमा बनवला जातो. तूमच्याही घरात असेच होत असेल तर ब्रेडच्या काही खास रेसिपी पाहुयात.

नाश्त्याला अनेक पारंपरिक रेसिपी केल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे ढोकळा. ढोकळा ही गुजराती डिश असली तरी ती इतर राज्यातही आवडीने खाल्ली जाते. आपल्या घरातील शिल्लक राहीलेल्या ब्रेडपासूनही ढोकळा बनवला जातो. तो कसा ते पाहुयात.

ब्रेडचा ढोकळा

साहित्य

ब्रेड 5 तुकडे, दही १ कप, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेले आले, हळद पावडर,हिंग,कढीपत्ता,मोहरी,चवीनुसार मीठ आणि तेल

सर्वात आधी दही घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, आले, हळद आणि मीठ घाला. हे तयार मिश्रण बाजूला ठेऊन द्या. आता ब्रेडचे स्लाईस घेऊन त्याचे समान चार भाग करून घ्या. गॅसवर कढई गरम करून त्यात तेल, हिंग, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी करा. या फोडणीत ब्रेडचे तुकडे दह्यात बुडवून पॅनमध्ये ठेवा. दोन्ही बाजूंनी दीड ते दोन मिनिटे बेक केल्यानंतर गॅस बंद करा आणि सर्व्ह करा.

ब्रेडपासून टोस्टही बनवले जातात. त्यामुळे याच टोस्टमध्ये थोडा बदल करून त्यावर विविध भाज्या आणि रव्याची लेयर लावून टोस्टची पौष्टीकता वाढवली जाऊ शकते. ते कसे पाहुयात

व्हेजिटेबल रवा टोस्ट

साहित्य

ब्रेड तुकडे, रवा १ कप, दही अर्धा कप, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली सिमला मिरची, बारीक चिरलेले गाजर, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली बीटरूट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार, तेल

एका भांड्यात रवा, दही, अगदी बारीक चिरलेल्या सर्व भाज्या आणि मीठ टाकून मिश्रण एकजीव करून घ्या. पॅनवर थोडे तेल गरम करा. तयार केलेले मिश्रण ब्रेडच्या दोन्ही बाजूला लावून घ्या. दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि हलके कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT