Carrot Paratha Recipe esakal
फूड

Carrot Paratha Recipe : बटाटा अन् मेथीच्या पराठ्याला कंटाळलाय, हा गाजराचा पराठा ट्राय करा

गाजरात अनेक पोषक गुणधर्म असतात जे लहान मुलांसाठीही चांगले असतात

Pooja Karande-Kadam

Carrot Paratha Recipe :

गाजर पराठा हा सर्वात स्वादिष्ट आणि पौष्टिक नाश्ता आहे. गाजर पराठा सर्वांनाच आवडतो. हे पराठे दही किंवा बटर किंवा लोणच्यासोबत गरमागरम सर्व्ह केले जातात. गाजराच्या गोडव्यामुळे लहान मुलांना ते खूप आवडते.

गाजरात अनेक पोषक घटक असतात आणि त्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. त्यामुळे सतत बटाटा आणि मेथीचे पराठे खाऊन कंटाळला असाल तर गाजराचा पराठा नक्की ट्राय करा. त्यामुळे शरीराला अनेक फायदेही मिळतात.

गाजर पराठ्याची रेसिपी जाणून घ्या.
साहीत्य-

  • 4 कप गव्हाचे पीठ

  • 2 कप चिरलेला गाजर

  • 1/2 कप चिरलेला कांदा

  • 1 टीस्पून चिरलेले आले

  • 1 टीस्पून चिरलेली हिरवी मिरची

  • 1/2 कप चिरलेली कोथिंबीर

  • 8 टेबलस्पून तूप

  • मीठ आवश्यकतेनुसार

 कृती

गाजर पराठा बनवण्यासाठी प्रथम गाजर धुवून किसून घ्या. यानंतर कांदा, आले, हिरवी मिरची आणि कोथिंबीर चिरून बाजूला ठेवा. आता एक मोठे भांडी घ्या आणि त्यात गव्हाचे पीठ, किसलेले गाजर, चिरलेला कांदा, चिरलेले आले, चिरलेली हिरवी मिरची, चिरलेली कोथिंबीर, मीठ आणि पाणी घाला.

नीट मिक्स करून पीठ मळून घ्या. लक्षात ठेवा की पीठ जास्त चिकट होऊ नये. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही गाजरातील पाणी पिळून काढू शकता जेणेकरून तुम्हाला पीठ व्यवस्थित मळून घेता येईल.

आता तुमचे गाजर पराठा बनवण्याचे साहित्य तयार आहे. नंतर पिठाचे छोटे गोळे तोडून त्यापासून गोल गोळे बनवा. यानंतर गोळ्याचे पराठे लाटून घ्या. तूप व्यवस्थित गरम झाल्यावर त्यावर पराठा टाकून खरपूस भाजून घ्या.

आता तुमचे गरमागरम गाजर पराठे तयार आहेत आणि ते दही किंवा लोणच्यासोबत सर्व्ह केले जाऊ शकतात. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही चहासोबत गाजर पराठ्याचाही आस्वाद घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Airport: पुरंदर विमानतळाच्या जागेला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा धक्का; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

Election Commission: आयुक्तांच्या नियुक्तीबाबत दोन प्रवाह; सर्वोच्च न्यायालयामध्ये कायदेशीर काथ्याकूट

Maharashtra Drought: दुष्काळ आढाव्याला आचारसंहितेचा फटका; कृषिमंत्र्यांच्या पुणे आणि नागपूर विभागाच्या नियोजित बैठका रद्द

Latest Marathi News Live Update : युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवलेंसह ३३ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे

Greater Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू , जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी टाकल्या उड्या

SCROLL FOR NEXT