फूड

Carrot Pickle Recipe: हिवाळ्यात बनवा गाजराचं लोणचं, जाणून घ्या सोपी रेसिपी

हिवाळ्यात गाजराचं लोणचं कधी ट्राय केलं आहे का?

Aishwarya Musale

हिवाळ्यात अनेक प्रकारचे स्वादिष्ट लोणचे तयार केले जातात, त्यापैकी एक आहे गाजराचे लोणचे. गाजराचे लोणचे खूप चवदार लागते आणि ते बनवण्याचे दोन मार्ग आहेत.

हे खूप चवदार लागते आणि रेसिपी देखील सोपी आहे. हिवाळ्यात मुळा, कोबी, बटाटे इत्यादींच्या पराठ्यांसोबत या लोणच्याचा आस्वाद घ्या. चला जाणून घेऊया गाजराचे लोणचे बनवण्याची पद्धत.

लागणारे साहित्य

गाजर - 1 किलो

हळद पावडर - 1 टीस्पून

लाल मिरची पावडर - 2 टीस्पून

जिरे - 2 टीस्पून

बडीशेप - 2 टीस्पून

मेथी दाणे - 1 टेबलस्पून

मोहरी - 1 टेबलस्पून

आमचूर  - 1 टीस्पून

मोहरी तेल - 300 ग्रॅम

मीठ - १ वाटी

गाजराचे लोणचे बनवण्याची पद्धत:

गाजराचे लोणचे बनवण्यासाठी सर्वप्रथम ताजे गाजर आणावे. यामध्ये तुम्ही कोणताही आकार घेऊ शकता. गाजर पाण्याने पूर्णपणे स्वच्छ करा, नंतर त्याची साल काढा आणि त्यांचे लहान तुकडे करा. तुम्ही गाजराचे पातळ आणि लांब तुकडे देखील करू शकता.

मसाले तळून बारीक करा आणि नंतर गाजर मिसळा

गाजराचे तुकडे एका मोठ्या भांड्यात काढून वरून हळद आणि मीठ घालून हाताने चांगले मिक्स करा. उर्वरित मसाले घालण्यासाठी, ते प्रथम तळणे आवश्यक आहे. त्यासाठी गॅसवर तवा ठेवा आणि त्यात मेथी, बडीशेप, जिरे, मोहरी टाकून थोडा वेळ भाजून घ्या.

भाजलेले मसाले मिक्सरच्या भांड्यात ठेवा आणि बारीक करा, नंतर ते गाजरमध्ये घाला आणि मिक्स करा. वरून लाल मिरची आणि आमचूर पावडर घाला. आता हे गाजर लोणचे एका काचेच्या डब्यात साठवा.

आता तेल घालायची वेळ आली आहे, पण त्याआधी कढईत तेल टाकून गरम करा. तेल थंड झाल्यावर गाजराच्या लोणच्यात घालावे. दररोज 3-4 तास सूर्यप्रकाशात ठेवा आणि कंटेनर 1-2 वेळा हलवून लोणचे मिसळा. तुमचे लोणचे आठवडाभरात तयार होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is Rudali Tradition? : देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना 'रुदाली'ची उपमा; पण रुदाली म्हणजे कोण? काय आहे ही विचित्र परंपरा?

Thane News: शिवशाहीची धोकादायक अवस्था, व्हायरल व्हिडीओनंतर प्रशासनाला जाग, अधिकाऱ्यांची सारवासारव

Adani Group Investment : दिवाळखोरीतून जाणाऱ्या ‘या’ कंपनीवर अदानी ग्रुप तब्बल १२५००००००००००० रुपये लावण्यास तयार!

Dhule News : धुळे जिल्हा बँकेचा 'कमाल': पीककर्ज वाटपात उद्दिष्ट ओलांडले, राष्ट्रीयीकृत बँका पिछाडीवर

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

SCROLL FOR NEXT