Cauliflower  Sakal
फूड

Cauliflower Winter Side Effects : हिवाळ्यात फ्लॉवर खाण्याचे तोटे; वाचून तुम्हीपण खरेदी टाळाल

निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार अतिशय महत्त्वाचा आहे.

सकाळ डिजिटल टीम

Cauliflower Winter Side effects : निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार अतिशय महत्त्वाचा आहे. हिवाळ्यात हिरव्या भाज्यांचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. मात्र, हिवाळ्यात काही भाज्या खाणे जसे फायदेशीर असते. तसेच काही भाज्या खाणे आरोग्यासाठी नुकसानदायी ठरू शकतात.

हिवाळ्यात आरोग्यासाठी फुलकोबी म्हणजेच फ्लॉवर खाण्याचे काही तोटे आहेत. आज आम्ही हिवाळ्यात फ्लॉवर खाण्याचे नेमके तोटे काय आहेत याबद्दल सांगणार आहोत. चला तर, जाणून घेऊन की, हिवाळ्यात फ्लॉवर खाल्याने आरोग्यावर याचे नेमके काय तोटे होतात.

friends

फ्लॉवर खाण्याचे तोटे

  • हिवाळ्यात फ्लॉवरचे अति सेवन केल्यास याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. कारण फ्लॉवरचे अति सेवन केल्याने शरिरातील फायबर आणि पाणी दोन्हीचे प्रमाण वाढते, ज्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, जुलाब यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जर, एखाद्या व्यक्तीला पचनसंस्थेचा त्रास होत असेल तर, त्याने फ्लॉवरचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे.

  • थायरॉईडमध्येही फ्लॉवर खाणे हानिकारक ठरू शकते. यासंबंधी काही संशोधनही समोर आले आहे, ज्यानुसार जर एखाद्या व्यक्तीला थायरॉईड असेल तर, फ्लॉवरच्या सेवनाने त्याची लक्षणे वाढू शकतात.

  • गर्भधारणेदरम्यान फ्लॉवचे सेवन हानिकारक असू शकते. वर उल्लेख केल्याप्रमाणे फ्लॉवरच्या अति सेवनामुळे अतिसार आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे गरोदर काळात महिलांनी फ्लॉवरचा आहारात समावेश करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

  • फ्लॉवरमध्ये प्युरीन नावाचे तत्व असते, जे शरीरात यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढवू शकते. ज्यामुळे भविष्यात मुतखडा होण्याचादेखील धोका वाढू शकतो. जर, तुम्हाला आधीपासूनच किडनी स्टोनचा त्रास असल्यास आहारात अति फ्लॉवर खाण्याचे टाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : "...तर सेवेचा राजीनामा द्या अन् संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा"; राज ठाकरेंची IPS विश्वास नांगरे पाटलांवर टीका

Malvan Swimming Pool VIDEO : काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून मारली उडी, डोकं तळाशी जोरात आपटलं, 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

Latest Marathi News Live Update : विशाळगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

Mumbai Water Supply: मुंबईवर कपातीचे संकट! धरणांनी गाठला तळ, अत्यल्प पावसामुळे चिंता

Video Viral: जग पाहता येत नाही... पण बापाच्या शब्दांनी रोनाल्डोचा गोल अनुभवला; लेकाची रिअ‍ॅक्शन डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT