Chaat Recipe Esakal
फूड

Chaat Recipe: विकेंड स्पेशल घराच्या घरी बनवा चना बूंदी चाट रेसिपी...

चणे हे प्रथिनांचा चांगला स्रोत आहे.

सकाळ डिजिटल टीम

चणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. चणे हे प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. अनेकांना फक्त चवीपुरते भाजलेले चणे खायला आवडतात. मात्र, चणे फक्त चवीसाठीच नाहीतर ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.हाडे मजबूत करण्यासाठी भाजलेले चणे खूप फायदेशीर आहेत. चण्यामध्ये कॅल्शियम असल्याने ते हाडांसाठी फायदेशीर आहेत. चणे खाल्ल्याने कमकुवत हाडे मजबूत होण्यास मदत होते. आजच्या लेखात आपणरविवार स्पेशल घराच्या घरी चना बूंदी चाट कसे तयार करायचे याची रेसिपी पाहू या..

साहित्य

दोन वाटी उकडलेले काळे हरभरे

अर्धा वाटी खारी बूंदी

एक बारीक चिरलेला कांदा

एक बारीक चिरलेले टोमॅटो

दोन चिरलेल्या हिरव्या मिरच्या

आलं लसूण पेस्ट

लिंबाचा रस

एक चमचा लाल तिखट

धने पावडर

आमचूर पावडर

व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल

जिरे

मोहरी

काळे मीठ

चाट मसाला

मीठ गरजेनुसार

कृती:

सर्वप्रथम एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे, चिरलेली हिरवी मिरची घालून शिजवा. तसेच उकडलेले काळे हरभरे घालून मंद आचेवर हलके भाजून घ्यावे. नंतर त्यात धने पूड, लाल तिखट, भाजलेले जिरेपूड, काळे मीठ आणि आमचूर पावडर घालून मंद आचेवर भाजून घ्यावी. मीठ सोबत चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. एका भांड्यात हरभरा आणि बुंदी एकत्र करून त्यावर लिंबाचा रस, कांदा, टोमॅटो मिक्स करावे. आता वरुन चाट मसाला आणि आलं लसूण पेस्ट टाकावी. तुमची स्वादिष्ट चाट सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asha Bhosle Video : 'या' शाळेत झालं आहे आशा भोसले यांचं शिक्षण, स्वतः व्हिडिओ शेअर करत सांगितल्या होत्या कोल्हापूरच्या गोड आठवणी

Gold Silver Price Impact War : सोने चांदी दरावर अद्याप युद्धाचा परिणाम, आठवड्यातील दराची आकडेवारी आली समोर

Mumbai local grocery shops: मुंबई लोकल स्थानकांवर पहिल्यांदाच किराणा दुकाने; कसारा, वासिंद, मानखुर्द येथे ‘प्रवासातच खरेदी’ची नवी सुविधा

Maharashtra: महसूल विभागात प्रतिनियुक्तीबाबत कडक निर्बंध लादले; महायुती सरकारचा मोठा निर्णय, कोणत्या अधिकाऱ्यांना लागू होणार?

‘फार थोडे दिवस राहिलेत’ आशा भोसले यांचं भावूक वक्तव्य पुन्हा चर्चेत, म्हणालेल्या...'आता माझं वय झालय'

SCROLL FOR NEXT