Chaitra Navratri 2023 esakal
फूड

Chaitra Navratri 2023 : नवरात्रीच्या उपवासात भगर खाऊन कंटाळलात, ट्राय करा साबुदाण्याची नवी कोरी रेसिपी

नवरात्रीच्या उपवासात दिवसभर फ्रेश ठेवेल असे साबुदाणा फ्रुट डेझर्ट तुम्ही ट्राय केलं का?

सकाळ डिजिटल टीम

चैत्र नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. घरोघरी चैत्र नवरात्रोत्सव साजरा होत आहे. रोज देवीच्या वेगवेगळ्या रूपात पूजा होत असून प्रत्येक दिवशी देवीला वेगळा प्रसाद दाखवतात. प्रसाद दाखवल्यानंतर तो पदार्थ कुटुंबातील सदस्य, नातलग, गरजू आदी अनेकांना वाटला जातो. जास्तीत जास्त लोकांना प्रसाद ग्रहण केल्याने देवीचा आशीर्वाद लाभेल ही त्या मागची भावना असते. यासाठी अनेकजण नऊ दिवस नऊ प्रकारचे गोड पदार्थ प्रसाद म्हणून तयार करतात. 

या उपवासादरम्यान लोक दारू, मांस, मच्छी, कांदा, लसूण खात नाहीत. तर, नवरात्रीत राजगिऱ्याचे पीठ, शिंगाड्याचे पीठ, ताज्या भाज्या, दूध, दही आणि मखाणे सारखे पदार्थ खाल्ले जातात कारण हे पोटासाठी हलके असतात. तसेच सहजतेने पचतात.

नियमित वापरणाऱ्या मीठाऐवजी सैंधव मीठ वापरले जाते कारण हे शुद्ध आणि प्रक्रिया केलेले नसते. ज्या लोकांना उपवास करायचा नाही ते लसूण आणि कांद्याशिवाय बनवलेले शाकाहारी सात्विक जेवण करू शकतात.

देवीच्या नैवेद्यासाठी आज आपण एक वेगळा पदार्थ पाहणार आहोत. जो साबुदाणा आणि फळांपासून बनतो. साबुदाणा फ्रुट डेझर्ट ही खीर सारखीच असते. हे बनवायला खूप सोपे आहे आणि आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

उपवासाच्या वेळी तूम्हाला एनर्जेटिक ठेवण्यात हे डेझर्ट मदत करेल. साबुदाणा फ्रूट डेझर्ट बनवण्याचे सर्व साहित्य तुमच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असेल. तूम्ही फक्त ते बनवा आणि खा.

साहीत्य

भिजवून शिजवलेला साबुदाणा - 1/2 कप, फुल क्रीम दूध - 1/2 लिटर, गोड आंबा,  काळी द्राक्षांचे बारीक काप, तसेच डाळिंबाचे दाणे, कंडेन्स्ड मिल्क - 1/2 कप, बदाम, काजू,बारीक चिरलेले मनुके, वेलची पूड, फुल क्रीम दूध - 1/2 कप

कृती

सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात शिजवलेला साबुदाणा आणि दीड कप कंडेन्स्ड मिल्क नीट मिक्स करून घ्या. नंतर त्यात फळे आणि ड्रायफ्रूट्सचे काप घाला. त्यात वेलची पूड घाला. हे थंड करायला ठेवा. हे तयार डेझर्ट तूम्हाला घट्ट वाटत असेल तर त्यात थंड दूध घालू शकता. साबुदाणा फ्रुट्स डेझर्ट तयार होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Hamas Ceasefire Broken: ‘’गाझावर पूर्ण ताकदीने हल्ला करा...’’ ; नेतान्याहू यांनी लष्कराला दिले आदेश!

Prashant Kishor Notice : बिहार निवडणुकीआधी प्रशांत किशोर यांना धक्का! ; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ जसलोक रुग्णालयात दाखल

Deglur News : मराठवाडा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष बाबू बिरादार यांचे दुःखद निधन; धनगरवाडीत अंत्यसंस्कार

सोशल मीडियावरील घटस्फोटाच्या चर्चा खऱ्या की खोट्या? सौरभपासून वेगळं होण्यावर योगिता चव्हाणने दिली प्रतिक्रिया, काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT